पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जम्मू-काश्मीरमध्ये कार दरीत कोसळली; १६ प्रवाशांचा मृत्यू

जम्मू-काश्मीर अपघात

जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. प्रवाशांना घेऊन जाणारी कार दोन हजार फूट खोल दरीत कोसळली. या अपघातामध्ये १६ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात ही घटना घडली आहे. या अपघातामध्ये अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना दरीतून बाहेर काढून उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले आहे.

शिवसेनेची सुप्रीम कोर्टात धाव, कपिल सिब्बल मांडणार बाजू

जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील खिलैनीमध्ये मंगळवारी दुपारी ही घटना घडली. बटोटे-किश्तवाड महामार्गावर हा अपघात झाला आहे. प्रवाशांना घेऊन जाणारी कार दोन हजार फूट खोल दरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळतचा जम्मू-काश्मीर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले. 

राज्यपाल भाजपचे बाहुले आहेत का?: सचिन सावंत

या अपघातामध्ये १२ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला होता. तर ४ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. अपघातात ४ ते ५ जण जखमी झाले असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान पोलिसांकडून या अपघाताचा तपास सुरु आहे. अपघातातील मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. 

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू, राष्ट्रपतींची स्वाक्षरी