पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कमलनाथ सरकारमधील १६ मंत्र्यांचे राजीनामे, ज्योतिरादित्य शिंदे गट 'नॉट रिचेबल'

मुख्यमंत्री मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ  आणि जोतिरादित्य शिंदे

मध्य प्रदेशमध्ये 'ऑपरेशन लोटस'ची तयारी सुरु असल्याची चर्चा रंगत असताना आता मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आपली चाल खेळली आहे. राजकीय उलथापलथीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी रात्री उशीराने कमलनाथ यांनी कॅबिनेटची बैठक बोलावली होती. या बैठकीत १६ मंत्र्यांनी राजीनामे दिले. मुख्यमंत्र्यांनी हे राजीनामे स्वीकारले असून ते पुढची चाल काय खेळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. गुंडांच्या मदतीने राजकीय अस्थिरता आणण्याचा राज्यात सुरु असलेला प्रयत्न कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होऊ देणार नाही, असे विश्वास कमलनाथ यांनी कॅबिनेटच्या बैठकीनंतर दिलेल्या प्रतिक्रियेवेळी म्हटले आहे.  

कमलनाथ यांच्या राज्यात 'ऑपरेशन लोटस'ची तयारी?

 दुसरीकडे काँग्रेसचे नेते जोतिरादित्य शिंदे यांच्या गटातील २७ आमदारांचे फोन नॉट रिचेबल येत आहेत. काही आमदार आणि नेते कर्नाटकमधील बंगळुरुमध्ये असल्याचे वृत्त यापूर्वीच समोर आले होते. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि राज्यसभा सदस्य दिग्विजय सिंह यांनी राज्यात सुरु असलेल्या परिस्थितीनंतर मुख्यमंत्री कमलनाथ यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. या बैठकीनंतर कमलनाथ यांनी कॅबिनेटची बैठक बोलवली. यावेळी १६ आमदारानी राजीनामा दिल्याचे समजते. 

प्रियांका गांधींना निवडणूक रिंगणात उतरवण्याची मागणी

आपल्या सोबत असलेल्या आमदारांना राजीनामा द्यायाल सांगत दूर गेलेल्या नाराज आमदारांना परत आणण्यासाठी कमलनाथांनी ही खेळी केली असावी, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगण्यास सुरुवात झाली आहे. तत्पूर्वी सरकार अस्थिर करण्याचे सर्व आरोप भाजप नेत्यांनी फेटाळून लावले होते. मध्य प्रदेशमधील राजकीय अंक कोणते वळण घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.