कोरोना विषाणूविरोधातील लढाई ही देशासाठी मोठे आव्हान असून यावर मात करण्यासाठी केंद्र सरकार देशातील राज्य सरकारसोबत एकमताने काम करत आहे. कोरोनाच्या लढ्यात खासगी आरोग्य क्षेत्रातूनही सरकारला सहकार्य मिळत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.
मंगळवारी मध्यरात्रीपासून देशात लॉकडाऊन, नरेंद्र मोदींची घोषणा
कोरोना विषाणूच्या जागतिक संकटाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने १५ कोटींच्या विशेष निधीची तरतूद केली आहे. रुग्णावरील उपचारासाठी साधन सामग्रीची कमतरता येणार नाही, यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असेही मोदींनी सांगितले.
अधिक जगण्यासाठी थोडी शैली बदलू : उद्धव ठाकरे
सध्याच्या घडीला आरोग्य हीच प्राथमिकता आहे. देशातील सर्व राज्यांना याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मेडिकल आणि पॅरामेडिकल प्रशिक्षणासंदर्भातही योग्य ती पावले उचलण्यात येत आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषध घेऊ नका, असेही नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितले.कायदा सुव्यवस्थेचे पालन करा. संयम दाखवून देत आपल्याला विजयाचा संकल्प पूर्ण करायचा आहे, असा संदेशही मोदींनी दिला.