पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारताने LOC वर केलेल्या कारवाईत १५ पाकिस्तानी सैनिक आणि ८ दहशतवादी ठार

भारताने LOC वर केलेल्या कारवाईत १५ पाकिस्तानी सैनिक आणि ८ दहशतवादी ठार (Screenshot/video sourced)

जम्मू-काश्मीरमधील केरन सेक्टरजवळील नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) दहशतवाद्यांच्या लाँचपॅडवर १० एप्रिल रोजी भारतीय सैन्याच्या हल्ल्यात ८ दहशतवादी आणि १५ पाकिस्तानी जवान मारले गेले. या घटनेशी निगडीत दोन सुरक्षा अधिकाऱ्यांनी 'हिंदुस्थान टाइम्स'ला ही माहिती दिली.

देशात कोरोनाबाधितांचा आकडा ८३५६ वर, १२७ रुग्णांना डिस्चार्ज

एका अधिकाऱ्याने म्हटले की, चुकांचे परिणाम भोगावे लागतील हा पाकिस्तानसाठी संदेश होता. पाकिस्तानने शस्त्रसंधी काळाचे उल्लंघन केले. त्याला प्रत्युत्तर देताना भारतीय लष्कराने किशनगंगा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या दुधनियाल येथील दहशतवाद्यांचे लाँचपॅडला लक्ष्य केले होते. येथे दहशतवाद्यांचे शिबीर होते. हा हल्ला पर्वतरांगावर असलेल्या केरन सेक्टर येथून केला होता. येथेच ५ एप्रिलला भारतीय लष्कराच्या विशेष कंमाडोंनी पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.

नोकरदार आणि करदात्यांसाठी केंद्र सरकारचे ५ दिलासादायक निर्णय

पाच दहशतवाद्यांपैकी ३ जम्मू-काश्मीर येथील होते. तर उर्वरित दोघांचे प्रशिक्षण जैश-ए-मोहम्मद यांच्याकडे झाली होती. परंतु, त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. 

तर, जम्मू आणि काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात रविवारी (१२ एप्रिल) पाकिस्तानी सैन्याने एलओसीवर गोळीबार करत पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल देवेंद्र आनंद यांनी 'आयएएनएस'ला सांगितले की, पाकिस्तानने मध्यरात्री १.४० वाजता पुंछ जिल्ह्यातील किरनी आणि कस्बा सेक्टरमध्ये मोर्टारसह छोट्या शस्त्रास्त्रांनी गोळीबार करत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. भारतीय लष्करही त्यांना प्रत्युत्तर देत आहे. पाकिस्तानी सैन्याने शनिवारीही पुंछ जिल्ह्यातील बालाकोट सेक्टरमध्ये विनाकारण गोळीबार केला होता.

कोरोनामुळे पुण्यात आज २ महिलांचा मृत्यू