पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ITBP कॅम्पमध्ये हलवलेले २४ पैकी १५ जण कोरोना बाधित

इटलीवरुन आलेल्या १५ पर्यटकांना कोरोनाची लागण

चीनच्या वुहान प्रांतातून सुरु झालेल्या कोरोना विषाणूमुळे जगभरामध्ये भितीचे वातावरण आहे. इटलीवरुन भारतात आलेल्या १५ पर्यटकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मंगळवारी या पर्यटकांना इंडो-तिबेट सीमा पोलिस  (आयटीबीपी) कॅम्पमध्ये हलवण्यात आले होते. एकूण २१ पर्यटक इटलीवरुन भारतामध्ये आले होते. त्यापैकी १५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये एका भारतीयाचा देखील समावेश आहे.

कोरोना झालेले इटलीतील दाम्पत्य राजस्थानात ६ जिल्ह्यांत फिरले होते

दक्षिण दिल्लीतील एका हॉटेलमध्ये इटलीवरुन आलेले २१ पर्यटक थांबले होते. मंगळवारी रात्री या हॉटेलमध्ये असलेल्या २४ जणांना दिल्लीतील आयटीबीपी कॅम्पमध्ये शिफ्ट करण्यात आले होते. या ठिकाणी त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल आज आला आहे. या अहवालामध्ये १५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या या रुग्णांवर डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली उपचार सुरु आहेत. 

अधीर रंजन चौधरींच्या सुरक्षेत वाढ; अज्ञातांनी घरात केली होती तोडफोड

दरम्यान, जयपूरमध्ये मंगळवारी ६९ वर्षीय इटलीच्या पर्यटकाच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. इटलीतील २० पर्यटकांचा एक गट जयपूर येथे फिरायला आला आहे. हे सर्व जण जयपूरमधील एका हॉटेलवर थांबले होते. त्याठिकाणी अचानक पर्यटकाच्या पत्नीची प्रकृती बिघडली. ताप आणि श्वसनाला त्रास होत असल्याने तिला जयपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्या रक्ताचे नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे (NIV) पाठवण्यात आले होते. 

कोरोनामुळे होळी मिलन कार्यक्रमात सहभागी न होण्याचा मोदींचा निर्णय