उत्तर प्रदेशमध्ये गेल्या तीन दिवासांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे उत्तर प्रदेशमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे १४ जिल्हे प्रभावित झाले आहेत. या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार पावसामुळे आणि विज पडून १५ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झआले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
15 dead, 133 buildings collapse as rainfall wreaks havoc in UP
— ANI Digital (@ani_digital) July 13, 2019
Read @ANI Story | https://t.co/LeJsTMci6Z pic.twitter.com/2LvITp636v
उत्तरप्रदेश प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या तीन दिवसामध्ये १५ जणांचा मृत्यू वादळामुळे आणि अंगावर विज पडून झाला आहे. तर २३ जनावरांचा देखील पावसामुळे मृत्यू झाला आहे. त्याव्यतिरिक्त १३३ इमारती कोसळल्या. उत्तर प्रदेशमधील उन्नाव, आंबेडकर नगर, प्रयागराज, बाराबंकी, हरदोई, लखीमपुर खीरी, गोरखपुर, कानपुर नगर, पीलीभीत, सोनभद्र, चंदौली, फिरोजाबाद, मऊ आणि सुल्तानपूर या जिल्ह्यांना पावसाचा सर्वात जास्त फटका बसला आहे.
निवृत्तीनंतर धोनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार येणाऱ्या काही दिवसात उत्तर प्रदेशमध्ये आणखी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावेळी वादळाची देखील फटका बसण्याची शक्यता आहे. पुढच्या ५ दिवसामध्ये उत्तरप्रदेशच्या लखनऊमध्ये देखील मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. गेल्या तीन दिवसापासून पडणाऱ्या पावसामुळे उत्तर प्रदेशमधील नदी, नाले, तलाव पाण्याने तुडुंब भरले आहेत.