पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Exclusive: ३२८ फरार दहशतवाद्यांचा देशभरातून शोध

दहशतवादी

फरार असलेल्या ३२८ दहशतवाद्यांचा देशभरातून शोध घेतला जात आहे. गृहमंत्रालयाने सर्व राज्यांच्या पोलिस महासंचालकांच्या माध्यमातून पोलिस अधिकाऱ्यांना याची माहिती दिली आहे. कानपूरमध्येही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना गोपनीय पॉकेट डायरी पाठवली आहे. यामध्ये इंडियन मुजाहिदीन, उल्फा आणि नक्षलींसमवेत १२ पेक्षा जास्त दहशतवादी संघटनांच्या सक्रिय सदस्यांच्या छायाचित्रांचा समावेश आहे. 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरबाबत झालेल्या निर्णयानंतर अनेक दहशतवादी संघटना सक्रिय झाल्या आहेत. ते १५ ऑगस्टपूर्वी एखादा मोठा घातपात घडवू शकतात. त्यासाठी गृहमंत्रालयाने डायरीत नोंद केलेल्या दहशतवाद्यांच्या माहितीच्या आधारावर या सर्वांच्या अटकेसाठी सहकार्य मागितले आहे. १५ ऑगस्टपर्यंत अभियान चालवल्यानंतर सर्व अधिकाऱ्यांकडून डायरी परत घेतली जाईल.

कोणत्या संघटनेचे किती दहशतवादी सक्रिय

इंडियन मुजाहिदीन १४, लष्कर ए तोयबा २८, अन्सार गजावत उलहिंद काश्मीर ०३, हिजबुल मुजाहिदीन १९, जैश ए मोहम्मद ०४, सिमी २२, जमात उल मुजाहिदीन बांगलादेश ०६, अलकायदा ०६, आयएसआयएस १०, शिख दहशतवादी ०६, उल्फा ०८, पीपल्स रेव्ह्युलेशनरी पार्टी ऑफ काग्लो पाक मणिपूर ०६. यांच्याशिवाय इतरही दहशतवादी सक्रिय आहेत. 

उत्तर प्रदेशमधील दहशतवाद्यांकडून सर्वाधिक धोका

आझमगडचा मिर्झा शादाब बेग, सरायमीरचा मोहम्मद खालिद, मोहम्मद साजिद, शादाब अहमद, डॉ. शहनवाज आलम, अबू राशिद, मोहम्मद राशिद उर्फ सुलतान, वासिक, फहद समवेत उत्तर प्रदेशमधील एक डझन दहशतवाद्यांकडून सर्वाधिक धोका आहे. अशाच पद्धतीने कानपूरमधून पकडण्यात आलेल्या कमरुद्दीनचा सहकारी आणि जम्मू-काश्मीरमध्ये लपलेल्या ओसामा बिन जावेद, जहांगीर समवेत तीन दहशतवादी एखाद्या कटाचे हिस्सा असू शकतात. जैश ए मोहम्मदचा ओवेश मलिक, गुजरातचा रसूल खान, हमास पाकिस्तानीकडून ही धोका आहे.

सिमी आणि नक्षलवाद्यांचे गड होते कानपूर

एकेकाळी कानपूर सिमीचा सर्वात मोठा गड होता. येथे अनेक नक्षलवाद्यांची धरपकड झालेली आहे. डायरीत सिमीच्या सक्रिय सदस्यांमध्ये रफीक पटेल, पुण्याचे रिझवान अहमद, रायपूरचे अझहर खान यांच्या नावाचा समावेश आहे. येथे वर्ष २००० मध्ये स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला दहशतवाद्यांनी आर्य नगर चौकात बॉम्बस्फोट करण्यात आला होता. २००१ मध्ये हिजबुल मुझाहिदीनशी निगडीत अनेक लोकांना अटक करण्यात आली होती.