गेले चौदा वर्षे खुनाच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेल्या सुभाष पाटीलनं तुरुंगात असतानाही डॉक्टर होण्याचं स्वप्न कधीही मागे पडू दिलं नाही. अखेर बालपणी पाहिलेलं ते स्वप्न पाटील यानं पूर्ण करून दाखवलं.
देशात परतणाऱ्या चिनी नागरिकांसाठी कोरोनामुळे नवा नियम अन्यथा शिक्षा
कर्नाटकमधील अफजलपूराचा रहिवाशी असलेला सुभाषनं १९९७ साली वैद्यकीय शिक्षणास प्रारंभ केला. मात्र २००२ साली त्याला खूनाच्या आरोपाखाली अटक झाली. २००६ मध्ये त्याला आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.
ज्योतिरादित्य शिंदे-कमलनाथ यांच्यातील वाद सोनिया गांधींच्या दारी
तुरुंगात असताना वैद्यकीय विद्यार्थी असलेला सुभाष तुरुंगाच्या ओपीडीमध्ये काम करू लागला. त्याचे चांगले वर्तन पाहून १५ ऑगस्ट २०१६ मध्ये त्याची शिक्षेतून मुक्तता करण्यात आली. मात्र तुरुंगातून बाहेर आल्यानंतर खचून न जाता त्यानं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करायचं ठरवलं.२०१९ मध्ये सुभाषनं आपलं अर्धवट राहिलेलं वैदयकीय शिक्षण पूर्ण केलं.