पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आपचे ७ नव्हे तर १४ आमदार संपर्कात, भाजपचा दावा

अरविंद केजरीवाल

भाजपने आमच्या ७ आमदारांना प्रत्येकी १०-१० कोटी रुपये देऊन विकत घेण्याचा प्रयत्न केला होता पण ते यात अपयशी ठरल्याचा आरोप आम आदमी पक्षाने (आप) बुधवारी केला होता. भाजपने मात्र यावर आश्चर्यकारक उत्तर दिले आहे. दिल्लीतील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री विजय गोयल यांनी आपचे ७ नव्हे तर १४ आमदार आमच्या संपर्कात असून यापेक्षाही अधिक आमदार पक्ष सोडू शकतात कारण त्यांच्या आमदारांची तिथे घुसमट होत आहे, असा दावा केला आहे.

आपच्या आमदारांना विकत घेण्यासाठी भाजपची १० कोटींची ऑफर- अरविंद केजरीवाल

गोयल म्हणाले, यापूर्वीही आपच्या आमदारांनी बंड केले आहे. अलका लांबा हे ताजे उदाहरण आहे. त्यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पक्षाचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांना वैतागून काँग्रेसमध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त केली होती. आपच्या काही आमदारांनीही आपल्याशी संपर्क केला असून ते भाजपमध्ये येऊ इच्छितात.

मोदी परत निवडून आले तर राहुल गांधी जबाबदार - केजरीवाल

भाजप आपच्या ७ आमदारांना प्रत्येकी १० कोटी देत असल्याचे पुरावे मनीष सिसोदिया यांच्याकडे असतील तर ते त्यांनी सार्वजनिक केले पाहिजेत. अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप करणे त्यांनी टाळले पाहिजे, असा सल्ला देखील त्यांनी दिला.