पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राजस्थान: धार्मिक कार्यक्रमस्थळी मंडप कोसळून १४ जणांचा मृत्यू

राजस्थानमध्ये धार्मिक कार्यक्रमासाठी उभारलेला मंडप कोसळल्याची घटना

राजस्थान येथील बाडमेर जिल्ह्यातील जसोल गावत रविवारी झालेल्या अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत जवळजवळ ५० जण गंभीर झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जखमींना जवळपास असणाऱ्या वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  

पीटीआयच्या वृत्तानुसार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक खींव सिंह भाटी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत आतापर्यंत १४ जणांनी आपला जीव गमावला आहे. जखमींनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबियांसाठी ५ लाख रुपये तर जखमींच्या कुटुंबियांसाठी २ लाखाची मदत जाहीर केली आहे.

जसोल गावात होणाऱ्या एका कार्यक्रमासाठी मंडप उभारलेला मंडप कोसळून ही दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे. रविवारी दुपारी जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मंडप कोसळला. त्यानंतर याठिकाणी उपस्थिती लोकांमध्ये धांदल उसळली. 

मायावतींनी भाऊ-भाच्याकडे दिली मोठी जबाबदारी

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: 14 killed and 50 injured as katha pandal falls during religious programme in rajasthan barmer