पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राष्ट्रपती भवनात कोरोनाचा रुग्ण, १२५ कुटुंब क्वारंटाईन

राष्ट्रपती भवन

राष्ट्रपती भवनात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याचं समोर आल्यानंतर इथे काम करणाऱ्या किमान १०० लोकांनी स्वत:ला क्वारंटाईन करुन घेतले आहे, अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं सुत्रांच्या हवाल्यानं दिली आहे.

मुंबईत या व्यक्तींना हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन नाही- आरोग्यमंत्री

गेट क्रमांक ७० येथे राहणाऱ्या किमान १२५ कुटुंबांना घरीच क्वारंटाइन होण्यास सांगण्यात आलं आहे, अशीही माहिती वृत्तसंस्थेनं दिली आहे. महाराष्ट्रापाठोपाठ दिल्लीत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहे, मंगळवार सकाळपर्यंत दिल्लीत हा आकडा २५०० च्या आसपास पोहोचला होता. दिल्लीत  कंटेनमेंट झोनची संख्याही वाढवण्यात आली आहे ही संख्या ७९ वरुन ८४ करण्यात आली आहे.

देशात कोरोना विषाणू बाधितांची संख्या वाढली आहे,  ही संख्या १८ हजार पार आहे, मंगळवार सकाळपर्यंत ही संख्या १८ हजार ६०१ वर पोहोचली तर ५९० जणांचा मृत्यू झाला. 

कोविड -१९: वुहानमध्ये अमेरिकन पथकाला प्रवेश देण्यास चीनचा नकार