पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सफाई सुरू!, भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या १२ वरिष्ठ केंद्रीय अधिकाऱ्यांना सक्तीची निवृत्ती

प्रातिनिधिक छायाचित्र

केंद्र सरकारने सोमवारी अर्थ मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या करवसुली विभागातील १२ वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने निवृत्त होण्याचे आदेश दिले आहेत. या सर्वांवर गैरवर्तणुकीचे त्याचबरोबर गैरव्यवहार केल्याचे, लैंगिक छळाचे आरोप आहेत. त्यामुळे त्यांना सरकारने दणका दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग दुसऱ्यांदा केंद्रात सत्तेवर आल्यानंतर पहिल्यांदाच या पद्धतीने भ्रष्ट वर्तणुकीचे आरोप असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. या सर्व घडामोडीशीं संबंधित सूत्रांनी ही माहिती दिली.

'EVM मध्ये नाही, तर निवडणूक अधिकाऱ्याकडील मशीनमध्ये गडबड'

ज्यांना तातडीने निवृत्ती करण्यात आले आहे, ते सर्व भारतीय महसूल सेवेतील (IRS) अधिकारी आहेत. त्यापैकी एक जण तर प्राप्तिकर विभागात अत्यंत वरिष्ठ स्तरावर कार्यरत आहे. एका सहआयुक्ताचा, तीन अतिरिक्त आयुक्तांचा आणि एका सहायक आयुक्तांचा यामध्ये समावेश आहे. 

संबंधित सूत्राने सांगितले की, नरेंद्र मोदी यांच्या 'ना खाऊंगा, ना खाने दूंगा' या सूत्रानुसारच ही कारवाई करण्यात येत आहे. या माध्यमातून सरकारला सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना संदेश द्यायचा आहे. सर्व स्तरातील भ्रष्टाचार बंद केलाच पाहिजे. सध्या ज्या पद्धतीने अर्थ मंत्रालयातील अधिकाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. ती भविष्यात इतर खात्यांमध्येही केली जाणार आहे. त्यामुळेच सरकारच्या या निर्णयामुळे वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांमध्ये वचक बसण्यास मदत होईल, असे या सूत्राने सांगितले. 

PM मोदींनी आपल्या निवासस्थानी घेतली मंत्रालयातील सर्व सचिवांची भेट

'हिंदूस्थान टाइम्स'ने दिलेल्या नावानुसार पुढील अधिकाऱ्यांना सरकारकडून आदेश देण्यात आले आहेत. त्यामध्ये अशोक कुमार अग्रवाल, संजय कुमार श्रीवास्तव, अलोक कुमार मित्रा, अरूलप्पा बी., अजॉय कुमार सिंग, बी बी राजेंद्र प्रसाद, होमी राजवंश, स्वेताभ सुमन, ए. रविंद्र, विवेक बात्रा, चंदर सैन भारती आणि रामकुमार भार्गव. या अधिकाऱ्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळू न शकल्याचे 'हिंदूस्थान टाइम्स'ने म्हटले आहे.