पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना : जपानच्या जहाजात अडकलेले ११९ भारतीय २० दिवसांनी मायदेशी परतले

११९ भारतीय २० दिवसांनी मायदेशी परतले

जपानच्या डायमंड  प्रिन्सेसमध्ये अडकलेले ११९ भारतीय गुरुवारी पहाटे मायदेशी परतले. एअर इंडियाच्या विशेष विमानानं गेल्या २० दिवसांपासून जहाजात अडकून पडलेल्या  भारतीयांना दिल्लीत आणण्यात आलं. दिल्लीत परतलेल्या भारतीयांबरोबर यात श्रीलंका, नेपाळ, दक्षिण आफ्रीका आणि पेरुच्या नागरिकांचाही समावेश आहे. टोकियोवरून या सर्वांना दिल्लीत आणण्यात आलं. 

मराठी भाषा दिन विशेष : अभिमन्यू आणि रिप व्हॅन व्हिंकल...

जपानमधील डायमंड  प्रिन्सेस हे आलिशान जहाज योकोहामामध्ये थांबवून ठेवण्यात आलं होतं. या जहाजात असलेल्या काही प्रवाशांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळून आली होती. तसेच कोरोनाची लागण झालेल्या जहाजावरील चार प्रवाशांचा बळीही गेला होता.  ५ फेब्रुवारीपासून हे जहाज बंदरात उभं करण्यात आलं होतं. जहाजातून कोणालाही  बाहेर पडण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे  या जहाजात विविध देशाचे एकूण ३, ७७१  प्रवासी अडकून होते. यात १३८ भारतीय व्यक्तींचाही समावेश होता त्यात १३२ कर्मचारी आणि ६ प्रवासी होते. गेले १४ दिवस हे जहाज संपूर्ण निगराणीखाली होते. डॉक्टरांकडून प्रत्येक  व्यक्तीच्या आरोग्याची चाचणी केली जात होती. 

दिल्ली हिंसाचार : १०६ जणांना अटक, १८ जणांवर गुन्हे दाखल

जहाजावर असेल्या १३२ भारतीय कर्मचाऱ्यांपैकी १६  कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली होती.  इथले अडकलेल्या भारतीयांनी मदतीसाठी सरकारकडे विनंती केली होती त्यानंतर गुरुवारी विशेष विमानानं त्यांना मायदेशी परत आणण्यात आलं.