पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विद्यार्थ्यांनी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करुन तिला फासावर लटकवले

प्रतिकात्मक छायाचित्र

आसाममधील बिस्वनाथ जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. सात विद्यार्थ्यांनी आपल्याच वर्गातील १२ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करुन तिला फाशी दिली. सर्व संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना शुक्रवारी घडली. 

'दादामियां गोधड्या भिजवत होते तेव्हा शिवसेना हिंदुत्त्वासाठी लढत होती'

चकला गावातील सात विद्यार्थ्यांनी परीक्षा संपल्यानंतर पार्टीच्या बहाण्याने मुलीला घरी बोलावले. त्यानंतर त्यांनी मुलीवर सामूहिक बलात्कार केला. आपले कृत्य लपवण्यासाठी पीडित मुलीला जंगलातील एका झाडाला गळफास देऊन ते पसार झाले. शनिवारी जंगलात मुलीचा मृतदेह आढळून आला. शवविच्छेदन अहवालात तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचे समोर आले. पोलिसांनी सातही आरोपींना अटक केली आहे. 

पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात; भरधाव टेम्पोने ५ जणांना चिरडले

या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. आरोपीही शाळेत शिकणारे विद्यार्थी आहेत. आपल्याच सहकारी विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दल संतापाची लाट उसळली आहे. 

तत्पूर्वी, २८ फेब्रुवारीलाही अशीच एक घटना समोर आली होती. राजधानी दिल्लीतील गाझियाबादमधील एका कॉलनीत राहणाऱ्या तिसऱ्या इयत्तेतील मुलीवर शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलांनी सामूहिक बलात्कार केला होता. दोन्ही संशयित हे नववी आणि दहावीचे विद्यार्थी आहेत. दोघांनीही मुलीवर चार दिवस दररोज एका खोलीत नेऊन तिच्यावर अत्याचार केला होता. मुलीची प्रकृती बिघडल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला.

'मुंबईत शिवसेना नंबर एक तर राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर हवी'