पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सिक्कीममध्ये भाजपला मोठे यश; एसडीएफचे १० आमदार भाजपमध्ये

एसडीएफचे १० आमदार भाजपमध्ये

सिक्कीममध्ये भाजपला मोठे यश मिळाले आहे. सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंटच्या (एसडीएफ) १० आमदारांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग यांच्यासह ५ आमदारांना सोडून बाकीच्या आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

एका रात्रीत काही बदलणार नाही, सरकारवर भरवसा ठेवावा 

सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंटच्या १० आमदारांनी आज भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. यावर्षी मे महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ३२ जागांपैकी १५ जागांवर एसडीएफने विजय मिळवला होता तर १५ जागांवर सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाने विजय मिळवला होता. या विजयानंतर प्रेम सिंह तमांग हे मुख्यमंत्री झाले होते.

काश्मिरी जनतेला भेटू देणार का? राहुल गांधींचा राज्यपालांना खोचक सवाल

सिक्कीममध्ये गेल्या १५ वर्षापासून एसडीएफची सत्ता होती. मात्र मे मध्ये झालेल्या निवडणुकीत पवन चामलिंग यांचे सरकार पडले. तर, प्रेम सिंह तमांग यांच्या सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा पक्षाने सिक्कीम विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. त्यानंतर २७ मे रोजी  प्रेम सिंह तमांग हे मुख्यमंत्री पदी विराजमान झाले. 

पूरग्रस्त भागासाठी राज्य सरकारकडून केंद्राकडे ६ हजार कोटींची मागणी