पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नरेंद्र मोदी यांच्या या फोटोसाठी लोक दहा लाख द्यायला तयार!

नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो विकत घेण्यासाठी सध्या चढाओढ सुरू झाली असून, एक हजार रुपये किंमत असलेल्या या फोटोसाठी ग्राहक दहा लाख रुपये द्यायलाही तयार झाले आहेत. नरेंद्र मोदी त्यांची आई हिराबेन यांच्याकडून आशीर्वाद घेत आहेत, असा हा फोटो आहे. तो घेण्यासाठी ऑनलाईन लिलाव सुरू झाला आहे. तीन ऑक्टोबरपर्यंत लोक लिलावात सहभाग घेऊ शकणार आहेत. त्यामुळे या फोटोची किंमत आणखी वाढण्याची शक्यता आहे.

पक्षांतर करून आलेल्या बहुतांश नेत्यांना भाजपकडून उमेदवारी पक्की

नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव सध्या सुरू आहे. यामध्ये एकूण २७७२ वस्तूंचा समावेश आहे. या सर्व भेटवस्तू नरेंद्र मोदींना वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने मिळाल्या आहेत. ३ ऑक्टोबरला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ऑनलाईन लिलाव सुरू राहिल. लिलावामध्ये मोदींचे अनेक फोटो आणि एका पेटिंगचाही समावेश आहे. पेटिंगची किंमत दोन लाख ३० हजार रुपये ठेवण्यात आली आहे. यासोबतच काही तलवारी आणि मूर्त्याही विक्रीला लिलावासाठी ठेवण्यात आल्या आहेत.

विक्रम लँडरशी संपर्क प्रस्थापित होण्याची शक्यता संपुष्टात - तज्ज्ञ

दिल्लीतील राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयात या वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. ऑनलाईन लिलावात सहभागी होण्यापूर्वी या वस्तू लोक तिथे जाऊन पाहू शकतात. लिलावामध्ये ज्या वस्तूसाठी जो व्यक्ती सर्वाधिक बोली लावेल, त्याला ती वस्तू देण्यात येणार आहे. लिलावातून येणारी रक्कम नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी नमामि गंगे योजनेसाठी वापरण्यात येणार आहे. याआधीही नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या वस्तूंचा लिलाव करण्यात आला आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:10 lakhs ready to pay for the photo of prime minister narendra modi know which photo is that