पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...

इटली कोरोना

कोरोना विषाणूचे संक्रमण जगातील अनेक देशांमध्ये वेगाने झाले. काही देशांमध्ये आजही रोज हजारो लोकांना कोरोनाची लागण होते आहे. बाधितांपैकी हजारोंचा मृत्यूही झाला आहे. एका विषाणूमुळे संपूर्ण जगाचे काम ठप्प होण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असेल. संपूर्ण जगात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या लोकांची संख्या तीस लाखांच्यावर गेली आहे. 

मुंबईतील ५५ पेक्षा जास्त वयाचे पोलिस घरी थांबले तरी चालेल - आयुक्त

कोरोनाबाधित रुग्णांची सर्वाधिक संख्या कोणत्या देशात आहे, याचा आढावा...

अमेरिका - अमेरिकेला कोरोना विषाणू संक्रमणाचा सर्वाधिक फटका बसला आहे. अमेरिकेत दहा लाखांपेक्षा जास्त नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ५५००० पेक्षा जास्त जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे.

स्पेन - स्पेनमध्येही कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या जास्त आहे. स्पेनमध्ये २,२९,४२२ रुग्ण आहेत. तर मृतांची संख्या २३००० च्या घरात आहे.

इटली - इटलीमध्ये १,९९,४१४ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर २६९७७ जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे.

फ्रान्स - इटलीनंतर या यादीमध्ये फ्रान्सचा क्रमांक लागतो. फ्रान्समध्ये १,६४,५८९ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. २३,२९३ लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे.

जर्मनी - जर्मनीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १,५८,७५८ इतकी आहे. पण जर्मनीमध्ये या आजारामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या युरोपातील इतर देशांपेक्षा कमी आहे. इटलीमध्ये ५७५० जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे.

ब्रिटन - ब्रिटनमध्ये १,५७,१४९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर २१,०९२ रुग्णांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे.

तुर्की - तुर्कीमध्ये १,१२,२६१ नागरिकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. तर २९०० नागरिकांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे.

लॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक

इराण - इराणमध्ये कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत ५८०६ जणांचा मृत्यू झाला. तर देशात ९१४७२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

रशिया - रशियामध्ये ८७००० नागरिकांना कोरोनीच लागण झाली आहे. तर ७९४ जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे. 

चीन - ज्या देशातून सर्वातआधी कोरोना विषाणूच्या संक्रमणाला सुरुवात झाली तो देश म्हणजे चीनमध्ये ८२८३६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर या देशात ४६३३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.