पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुलवामामध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त

पुलवामामध्ये चकमक

जम्मू-काश्मीरच्या सीमा भागांमध्ये दहशतवाद्यांच्या कुरापती सुरुच आहेत. पुलवामामध्ये मंगळवारी दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली. या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. ठार केलेल्या दहशतवाद्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, घटनास्थळी जवानांकडून शोध मोहिम सुरु आहे.

'काश्मीरला भारत मुक्त करा असे म्हटले तर खपवून घेणार नाही'

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलवाम्यातील अवंतिपुराजवळील चूरस्वू गावामध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे जवानांनी घटनास्थळी धाव घेत घेराव घातला आणि शोध मोहिम सुरु केली. त्यावेळी लपून बसलेल्या दहशतवाद्याने गोळीबार केला. यावेळी झालेल्या चकमकीत या दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला.

गेट वे ऑफ इंडिया आंदोलनाचे ठिकाण नाही: गृहमंत्री

शाहिद अशी ठार झालेल्या दहशतवाद्याची ओळख पटली आहे. तो आनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहरा भागात राहणारा होता. पोलिसांनी सांगितले की, या दहशतवाद्याला जवानांनी आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते. मात्र त्यांनी जवानांवर गोळीबार केला. थोड्यावेळ चाललेल्या चकमकीत त्याला  ठार करण्यात यश आले.  

जेएनयू हिंसाचार: आयशी घोषसह २२ विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा