पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

महिलेच्या पोटातून काढले दीड किलोचे दागिने, ६० नाणी

महिलेच्या पोटातून काढलेले दागिने

पश्चिम बंगालमध्ये एका महिलेच्या पोटातून शस्त्रक्रिया करून तब्बल १.६८ किलो वजनाचे दागिने, ६० नाणी आणि मनगटी घड्याळ बाहेर काढण्यात आले. रुनी खातून असे या महिलेचे नाव आहे. बीरभूम जिल्ह्यात रामपूऱ्हाट शासकीय रुग्णालयात बुधवारी ही शस्त्रक्रिया करण्यात आली. 

टीक-टॉक व्हिडीओमुळे महिला पोलिसाचं निलंबन

पोटात दुखत असल्याने रुनी हिला तिच्या नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल केले. ते मनोरुग्ण असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सुमारे एक तास १५ मिनिटे ही शस्त्रक्रिया सुरू होती. शस्त्रक्रियेनंतर तिची प्रकृती ठिक असून, तिच्यावर मानसिक उपचारही करण्यात येत आहेत, असे रुग्णालयाचे उप अधिष्ठाता शर्मिला मौलिक यांनी सांगितले. 

नातेवाईकांनी रुनी हिला रुग्णालयात दाखल केल्यावर तिच्या पोटावर विविध चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये तिच्या पोटात धातूच्या विविध वस्तू असल्याचे आढळले. शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी सांगितले की, आम्हाला त्यांच्या पोटात विविध प्रकारचे दागिने मिळाले. ज्याचे वजन १.६८ किलो इतके आहे. त्याचबरोबर पोटात ६० नाणी आणि एक मनगटी घड्याळी आढळले. 

राजीव गांधी हत्येतील दोषी नलिनी हिची पॅरोलवर महिन्यासाठी सुटका

पोटात सापडलेल्या सर्व वस्तू आपणच खाल्ल्या असल्याचे रुनी हिने डॉक्टरांना सांगितले. रुनीच्या भावाचे दागिन्यांचे दुकान आहे. तिथे रुनी बसत होती. त्यावेळीच तिने या वस्तू खाल्ल्या असण्याची शक्यता तिच्या नातेवाईकांनी वर्तविली आहे.