पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्ली विधानसभेसाठी मतदान सुरु, ७० जागेसाठी ६७२ उमेदवार रिंगणात

दिल्ली विधानसभा निवडणूक

दिल्ली विधानसभेच्या ७० जागेसाठी आज सकाळी ८ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदारांना मतदान करता यणार आहे. दिल्लीमध्ये एकूण १.४७ कोटी मतदार असून यात ८१. ०५ लाख पुरुष तर ६६.८० महिला मतदारांचा समावेश आहे. २.३२ लाख नवे मतदार दिल्लीच्या विधानसभा निवडणूकीत पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणुकीचा निकाल ११ फेब्रुवारीला लागणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठा बंदोबस्त तैणात करण्यात आला आहे. सुधारित नागरिकत्व कायद्याच्या पार्श्वभूमीवर शाहिन बाग येथे सुरु असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी खास सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. ७० जागेसाठी ६७२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. 

'अर्थसंकल्पावरील सीतारमन यांचं भाषण म्हणजे सत्यनारायणची कथा'

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील दिल्लीतील ७ पैकी ७ जागा भाजपने जिंकल्या होत्या. लोकसभेतील ही कामगिरी कायम ठेवत दिल्लीचे तख्त बदलण्याच्या इराद्याने भाजप प्रयत्नशील आहे. २०१५ मध्ये आम आदमी पक्षाने ७० पैकी ६७ जागा जिंकत दिल्लीत एकहाती सत्ता मिळवली होती. त्यांची सत्ता उलथून लावत दिल्ली काबीज करण्यासाठी भाजपने २२० खासदार आणि ११ मुख्यमंत्र्यांसह प्रचार मोहिम राबवली होती. त्यामुळे दिल्लीकर या निवडणुकीत कुणाला संधी देणार हे पाहणे महत्त्वाटे ठरेल. 

देशाची आर्थिक स्थिती हाताबाहेर गेली, पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

मागील विधानसभा निवडणुकीत दिल्लीमध्ये ६७.१२ टक्के मतदान झाले होते. यापूर्वी २०१३ चा विचार केल्यास यावेळी ६५.६३ टक्के मतदानाची नोंद झाली होती. तर २००८ मध्ये केवळ ५७.५८ टक्के मतदान झाले होते. २००३ च्या विधानसभा निवडणुकीत हा आकाडा ५३.४२ टक्के इतका होता. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात तरुणाई मतदान करणार असून त्यामुळे मतदानाच्या टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:0 seats 672 candidates and 1 point 47 crore voters know 10 important point related to Delhi elections