पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाविरोधातील लढा एकत्रित लढू, मोदी-ट्रम्प यांच्यात एकमत!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

जगभरात कोरोना विषाणूटचा प्रादुर्भाव दिवसागणित वाढताना दिसतोय. कोरोनाशी लढा देण्याच्या मुद्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. दोन्ही राष्ट्रांनी एकत्र येऊन कोरोनावर मात करण्याचा संकल्प दोन्ही नेत्यांनी केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट्च्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, भारत-अमेरिका दोन्ही राष्ट्रांनी कोरोनाविरोधातील लढ्यात एकमकांना सहकार्य करण्याबाबत एकमत झाले. 

कोविड-१९ : आता PM मोदी विरोधकांसोबत चर्चा करणार

भारताच्या तुलनेत अमेरिकेत कोरोना विषाणूचा मोठा फटका बसला आहे. याठिकाणी जवळपास पावणे तीन लाख लोकांना कोरोनाची लागण झाली असून सात हजारहून अधिक लोकांनी जीव गमावला आहे. भारतात तीन हजारहून अधिक लोक कोरोनाच्या जाळ्यात अडकले असून मृतांचा आकड्याने सत्तरी ओलांडली आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. केंद्र सरकारने देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा करुन कोरोनाच्या लढ्यावरोधात रणनिती आखली आहे. 

सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण २१ ते ४० वयोगटात, आरोग्य मंत्रालय

आरोग्यमंत्र्यांनी शनिवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मागील चोवीस तासात देशातसर्वाधिक पाचशहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. मृतांचा आकाडाही वाढला असून ७५ लोकांनी आतापर्यंत कोरोनामुळे जीव गमावला आहे. जगभरात कोरोनाने जवळपास ६० हजार लोकांनी आपला जीव गमावला आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title::PM Modi after talking with US President Doanld Trump on Phone says agreed to deploy the full strength of the India US partnership to fight Corona