पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारताविरुद्ध युद्ध झाल्यास आमच्याकडे दोनच पर्याय: इम्रान खान

इम्रान खान

भारताविरुद्ध अणू युद्धाची भाषा करणाऱ्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांना आपले राष्ट्र पुन्हा तोंडावर पडले, याची उपरोक्ती झाली आहे. जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानंतर भारताच्या अंतर्गत मुद्यासंदर्भात हस्तक्षेप करत पाक पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतासोबत युद्ध करण्यासही तयार आहोत, असे म्हटले होते. 

इम्रान खान यांनी नुकतीच 'अल जजीरा'ला एक मुलाखत दिली. यावेळी त्यांना दोन्ही राष्ट्रांतील तणावजन्य परिस्थितीमध्ये युद्ध झाल्यास काय होईल? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर इम्रान म्हणाले की, दोन्ही राष्ट्रांकडे अण्वस्त्रे आहेत. भारतासोबत पुन्हा युद्ध झाल्यास आमच्यासमोर दोन पर्याय असतील. एक तर आम्हाला आत्मसमर्पण करावे लागेल किंवा आम्हाला अखेरच्या श्वासापर्यंत लढावे लागेल. आम्ही अखेरच्या श्वासापर्यंत लढणे पसंत करेन.  

ओसामा बिन लादेनच्या मुलाचा खात्मा, ट्रम्प यांचा दुजोरा

यावेळी त्यांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित करुन पुन्हा एकदा भारतावर बिनबुडाचे आरोप केले. काश्मीरमधील ८० लाख मुस्लिम बांधव सहा आठवड्यांपासून कैदेत आहेत. आमच्या राष्ट्रांवर दहशतवादाचा आरोप करुन भारत काश्मीरमधील परिस्थितीवरुन लक्ष्य विचलित करत असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. यापूर्वी युद्धाची भाषा करणाऱ्या इम्रान यांनी यावेळी पुन्हा एकदा कोलांट उडी घेतल्याचे पाहायला मिळाले.

पाकिस्तान कधीच युद्धाची सुरुवात करणार नाही. मी शांतीप्रिय व्यक्ती आहे. युद्धाच्या माध्यमातून कोणत्याही गोष्टीवर तोडगा निघणार नाही. मी युद्धाच्या विरोधात आहे, असे इम्रान खान यावेळी म्हणाले. दोन्ही राष्ट्रांकडे अण्वस्त्रे आहेत. युद्धात याचा वापर झाला तर या युद्धाची कल्पना करता येणार नाही. त्यामुळेच आम्ही सयुंक्त राष्ट्राकडे धाव घेतली होती, असेही ते यावेळी म्हणाले.  

पीओके भारताला सोपवणंच पाकच्या हिताचं: रामदास आठवले