हवाई वाहतूक करारातील आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल यांना ईडीने समन्स बजावले आहे. याप्रकरणी त्यांना येत्या ६ जून रोजी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत 'एएनआय'ने वृत्त दिले आहे. दरम्यान प्रफुल्ल पटेल यांनी ईडीला सहकार्य करणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेच्या प्रचारावेळी गोंदिया येथील सभेत याबाबत सूचक वक्तव्य केले होते, असे बोलले जात आहे.
Former Civil Aviation Minister and NCP leader Praful Patel to ANI: I will be happy to cooperate with the Enforcement Directorate to help them understand the complexities of aviation sector. pic.twitter.com/Q8n6uZdBEO
— ANI (@ANI) June 1, 2019
पटेल यांचा निकटवर्तीय उद्योग सल्लागार दीपक तलवार याच्यावर प्राप्तिकर कार्यालयाने गुन्हे दाखल केले आहेत. स्वत:च्या तसेच कुटुंबीयांच्या बँक खात्यांत शेकडो कोटी रुपयांची रक्कम अवैधपणे जमा केल्याचा तलवारवर आरोप आहे. आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असणारे काही हवाई मार्ग तलवारने ३ आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना मिळवून दिले होते. या मोबदल्यात तलवारला २००८-०९ या काळात २७२ कोटी रुपये मिळाल्याचा दावा ईडीने केला होता. चौकशीपासून वाचण्यासाठी तलवार देश सोडून पळाला होता. त्यानंतर त्यांचे दुबईतून प्रत्यार्पण करण्यात आले होते.
'पक्षात मला कोणाचे ऐकून घ्यावे लागत असेल, तर ते ताईंचे'
आर्थिक स्थिती नसताना ७० हजार कोटी रुपये किंमतीच्या १११ विमानांची खरेदी, एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्सचे विलीनीकरण, परकीय गुंतवणूकीतून प्रशिक्षण संस्था सुरु करणे तसेच आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असणारे काही हवाई मार्ग खासगी कंपन्यांना देणे याचा ईडीकडून तपास सुरु आहे.