मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  शहरातील रस्त्यांवर दिसला शर्टलेस 'झोंबी', लोकांचा घेऊ लागला चावा; VIDEO व्हायरल

शहरातील रस्त्यांवर दिसला शर्टलेस 'झोंबी', लोकांचा घेऊ लागला चावा; VIDEO व्हायरल

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 04, 2024 06:28 PM IST

Man Biting People : दारूच्या नशेत शर्टलेस झालेला परदेशी नागरिक बाइकस्वार व्यक्तीला चावण्याचा प्रयत्न करत आहे. आसपासच्या लोकांनी व पोलिसांनी त्याला पकडले.

परदेशी व्यक्तीकडून प्रवाशांना चावा घेण्याचा प्रयत्न
परदेशी व्यक्तीकडून प्रवाशांना चावा घेण्याचा प्रयत्न

Viral Video : चेन्नईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. दारूच्या नशेत शर्टलेस झालेला परदेशी नागरिक बाइकस्वार व्यक्तीला चावण्याचा प्रयत्न करत आहे. आसपासच्या लोकांनी व पोलिसांनी त्याला पकडले. रोयापेट्टा परिसरातील ही घटना सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडियो क्लिपमध्ये परदेशी नागरिकाला आक्रमकपणे बाइकस्वार व्यक्तीच्या अंगावर जाऊन त्याच्या गळ्याला चावा घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते.

पोलीस व आसपासच्या लोकांनी मध्यस्थी करत प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. या घटनेने तेथून जात असलेल्या नागरिकांनाही त्रास झाला. गोंधळ निर्माण झाल्यानंतर घटनास्थळी लोकांची गर्दी जमली.

हिन्दुस्तान टाइम्स मराठी या व्हिडिओच्या प्रामाणिकतेची व वेळेची पुष्टी करत नाही. मात्र सोशल मीडियामध्ये याबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत.

या व्हिडिओवर सोशल मीडियावर वेगवेगळे कमेंट येत आहेत. काही लोकांनी विदेशी नागरिकाची तुलना झोंबीशी केली आहे. काही लोकांनी सार्वजनिक ठिकाणी दारू व अन्य अमली पदार्थांची विक्री व सेवन करण्यावर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे.

सोशल मीडिया प्लेटफॉर्मवर एका व्यक्तीने लिहिले की, ही लाजीरवाणी झोंबी घटना चेन्नईमध्ये घडली आहे. एक परदेशी नागरिक कथितरित्या नशेच्या स्थितीत प्रवाशांना चावण्याचा प्रयत्न करत आहे. तो रस्त्यावरून सैरावैरा पळत आहे. एका यूजरने लिहिले की, त्याला बेड्या घालून का नेले जात नाही? चेन्नई पोलीस आपल्या कर्मचाऱ्यांना बेड्या का देत नाही.

एकाने लिहिले की, जर एखाद्या भारतीयाने लंडन किंवा न्यूयॉर्कमध्ये असे केले असते तर पर्यटकांसाठी आणि व्हिसासाठी कडक कायदे करण्याची मागणी करत संपूर्ण अनिवासी भारतीयांना दोषी ठरवले असते.

प्रियकरासाठी तीन लेकरांची आई विजेच्या खांबावर चढली

 एक महिला घरातून बाहेर पडली व विजेच्या खांबावर चढली. त्यानंतर तेथे हाय व्होल्टेज ड्रामा सुरू झाला. काही वेळातच तेथे बघ्यांची गर्दी झाली. तीन मुलांच्या आईचा एका तरुणावर जीव जडला. त्याला आपल्या घरातच ठेवण्याची तिची इच्छा होती. मात्र पतीने याला विरोध केला. त्यानंतर नाराज होऊन ती विजेच्या खांबावर चढली. तिने पोलवर चढून ११ हजार केवीएच्या हायटेंशन वायरला घट्ट पकडले. त्यामुळे वीज खंडित केल्यामुळे मोठा अनर्थ ठरला. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थली दाखल झाले व त्यांनी महिलेची समजूत काढून तिला खाली उतरवले. ही घटना  गोरखपूरमधील पिपराइच पोलीस ठाणे परिसरात बुधवारी दुपारी घडली. 

IPL_Entry_Point

विभाग