Zombie Drug Sierra Leone : जगभरात ड्रग्सच्या आहारी मोठ्या प्रमाणात तरुणाई वावाहत चालली आहे. यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात मुलांचा मृत्यू देखील होत आहे. दरम्यान, पश्चिम आफ्रिकेतील सिएरा लिओन या देशातील तरुणाई एका भयंकर ड्रग्सच्या आहारी गेली आहे. झोंबी ड्रग्स (Zombie drug crisis) असे या ड्रग्सचे नाव असून याची नशा करण्यासाठी येथील नशेच्या आहारी गेलेले तरुण देशातील कबरी खोदून मानवी हाडांपासून हे ड्रग्स तयार करून त्याचे सेवन करत असल्याने खळबळ उडाली आहे. सध्या या देशातील परिस्थिती हाताबाहेर गेली असून येथील सरकारने थेट आणीबाणी लागू केली आहे.
पश्चिम आफ्रिकेतील सिएरा लिओन हा अत्यंत गरीब देश आहे. येथे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात असून गुन्हेगारीने देखील कळस गाठला आहे. काम नसल्याने मोठ्या प्रमाणात तरुणाई नशेच्या आहारी गेली आहे. येथील तरुण मानवी हाडांपासून तयार करण्यात येणाऱ्या झॉम्बी ड्रग या सायकोॲक्टिव्ह ड्रग्सच्या आहारी गेले आहे. यामुळे चिंता वाढली आहे. अतिशय स्वस्त असलेल्या या ड्रग्समुळे येथे मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहे.
पश्चिम आफ्रिकेतील सिएरा लिओन देश एक छोटा देश आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गरीबी आणि बेरोजगारी आहे. येथील सरकार रोजगार निर्मिती करण्यासाठी अपयशी ठरला आहे. काम नसल्यामुळे येथील तरुणाई नशेच्या आहारी गेली आहे. या साठी थेट कबरी खोदून हाडांची चोरी करून त्याच्या वापर झोंबी ड्रग्स तयार करण्यासाठी केला जात आहे. या ड्रग्सची मोठी मागणी देशात आहे. ड्रग्स तस्कर देखी ही हाडे घेऊन स्वस्तात मिळणाऱ्या या ड्रग्सची निर्मिती करून त्याची विक्री करत आहेत. त्यामुळे देशाचे अध्यक्ष ज्युलियस माडा बायो यांनी कबरीच्या संरक्षणासाठी तयारी केली असून स्पेशल टास्क फोर्स तयार केले आहे. तसेच नशेच्या आहारी गेलेल्यांविरोधात नो टॉलरन्स पॉलिसी तयार करण्यात आली असून या अंतर्गत देशात आणीबाणी लागू करण्यात आली आहे.
या नशेच्या आहारी देशातील तब्बल ६३ टक्के तरुणाई गेली आहे. येथील रुग्णालये या नशेच्या आहारी गेलेल्या तरुणांनी भरले आहेत. हे ड्रग्स कुशया नावाने प्रसिद्ध आहे. या ड्रग्समुळे आरोग्यावर गंभीर परिमाण होत असून लोक अनेक प्रकारच्या आजारांना बळी पडत आहेत. या ड्रग्सच्या सेवनामुळे येथील अनेकांच्या शरीरावर सुज आली असून त्यांना या नशेतून मुक्त करणे सरकार पुढे आव्हान बनले आहे. झॉम्बी ड्रग्स बनवण्यासाठी लोक कबरी खोदत असून यामुळे स्मशानभूमींचं संरक्षण करण्याची मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
झॉम्बी ड्रगला कुश ड्रग्स म्हटले जाते. हे ड्रग्स अतिशय स्वस्त आणि निकृष्ट दर्जाचे आहे. या संदर्भात बीबीसीने वृत्त दिले असून कुश ड्रग हे अनेक विषारी पदार्थांचे मिश्रण करुन तयार करण्यात येतं. यात प्रामुख्याने मानवी हाडांचा वापर केला जातो. तसेच या ड्रग्सच्या सेवनानंतर झोंबी सारखे वागत असून त्यामुळे या कुश ड्रग्सला झॉम्बी ड्रग म्हटले जाते. या ड्रग्सचे नाव झायलाजीन (Xylazine) असे देखील आहे. हे औषध प्रामुख्याने जनावरांसाठी वापरले जाते. याद्वारे जनावरांना बेशुद्ध केले जाते. काळ्या बाजारात याची मोठी विक्री केली जाते. हे ड्रग स्वस्त असल्याने नशेबाज याचे मोठ्या प्रमाणात सेवन करत आहेत.
हे ड्रग्स सेवन केल्यावर शुद्ध हरपते. तसेच नशा करणारा व्यक्ति हा झॉम्बी सारखा वागू लागतो. त्याच्या शरीराची हालचाल देखील कमी होते. ड्रग्सचे अतिसेवन केल्याने त्वचेवर जखमा होतात. या जखमा सडून व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो.