कर्तव्यपारायणता.. महापुरात जीव धोक्यात घालून Zomato बॉयची फूड डिलिव्हरी; भावुक झाले लोक, VIDEO Viral-zomato delivery boy wades through knee deep flood water to deliver order video viral ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  कर्तव्यपारायणता.. महापुरात जीव धोक्यात घालून Zomato बॉयची फूड डिलिव्हरी; भावुक झाले लोक, VIDEO Viral

कर्तव्यपारायणता.. महापुरात जीव धोक्यात घालून Zomato बॉयची फूड डिलिव्हरी; भावुक झाले लोक, VIDEO Viral

Aug 31, 2024 04:59 PM IST

Zomatodelivery boy viral Video : व्हिडिओमध्ये दिसते की, तो अहमदाबादमध्ये गुडघाभर पाण्यातून वाट काढत कोणाचे तरी जेवण पोहोचवत आहेत. त्याच्या जवळ काही कार व बसेसही पाण्यात बुडल्याचे दिसत आहे.

जीव धोक्यात घालून  Zomato बॉयची फूड डिलिव्हरी
जीव धोक्यात घालून  Zomato बॉयची फूड डिलिव्हरी

सध्या देशातील अनेक राज्यात मान्सून जोरदार बरसत आहेत. अनेक भागात महापूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामध्ये गुजरातमधील अनेक भागाचा समावेश आहे. गुजरातमधील अहमदाबाद शहर जलमय झाले आहे. यामुळे सुरक्षित राहण्यासाठी लोक आपल्या घरातून बाहेर पडेनासे झाले आहेत. सध्या लोक घरबसल्या ऑनलाइन जे पाहिजे ते मागवू शकतात. मात्र कल्पना करा की, महापुराच्या स्थितीत डिलीवरी करणे किती कठीण आहे. मात्र काही लोकांची मजबुरी असते की, ते महापूर-वादळातही आपली जबाबदारी पार पडतात. सध्या अशाच व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून लोक भावुक होत आहेत.

हा व्यक्ती फूड डिलीव्हरी कंपनी झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, तो अहमदाबादमध्ये गुडघाभर पाण्यातून वाट काढत कोणाचे तरी जेवण पोहोचवत आहेत. त्याच्या जवळ काही कार व बसेसही पाण्यात बुडल्याचे दिसत आहे. मात्र तो तरीही आपल्या डिलिव्हरीसाठी पुढे चालला आहे.

एक्स यूजर विकुंज शाह यांनी याची १६ सेकंदाची क्लिप शेअर केली आहे. जी आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यामध्ये त्यांनी झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल यांना डिलिव्हरी बॉयला त्याच्या कमिटमेंट आणि डिटर्मिनेशनसाठी बक्षीस देण्याची मागणी केली आहे. दरम्यान झोमॅटो कंपनीने यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, संबंधित डिलीवरी एजंटची ओळख पटवण्यासाठी विकुंज यांना ऑर्डर आयडी शेअर करण्यास सांगितले आहे. जेणेकरून त्याला योग्य बक्षीस दिले जाईल.

हा व्हिडिओ अन्य एक एक्स यूजर नीतू खंडेलवाल यांनीही शेअर केला आहे. त्यांनी लिहिले आहे की, 'मी दिपेंदर गोयल यांना विनंती करते की, या कष्टाळी डिलिव्हरी बॉयला शोधून योग्य बक्षीस द्यावे. लोक या डिलीवरी एजेंटचे तोंडभरून कौतुक करत आहेत. दरम्यान या पोस्टवर अनेक लोकांनी अशा परिस्थितीत फूड ऑर्डर करणाऱ्या ग्राहकावर टीका केली आहे. लोकांनी म्हटले की, झोमॅटोने पूर आलेल्या ठिकाणी ऑर्डर देणे बंद करावे. यामुळे डिलीवरी कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

गुजरातच्या सौराष्ट्र-कच्छ परिसरात गेल्या ठवड्यापासून मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान विभागाने (आयएमडी) म्हटले की, राज्यात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून किनारपट्टीला चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे. अतिवृष्टीमुळे चार दिवसात ३२ लोकांचा बळी गेला आहे. राज्यात महापुरामुळे ३२ हजाराहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. पुरात अडकलेल्या १२०० लोकांना वाचवले आहे.

विभाग