Viral Video: बाईकवर पुढं मुलाला बसवलं, पायात चप्पल नाही; फूड डिलिव्हरी करणाऱ्या महिलेचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video: बाईकवर पुढं मुलाला बसवलं, पायात चप्पल नाही; फूड डिलिव्हरी करणाऱ्या महिलेचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ

Viral Video: बाईकवर पुढं मुलाला बसवलं, पायात चप्पल नाही; फूड डिलिव्हरी करणाऱ्या महिलेचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ

Nov 18, 2024 01:10 PM IST

Zomato delivery Women Viral Video: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये एक महिला आपल्या मुलासोबत घरोघरी फूड डिलिव्हरी करताना दिसत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या हृदयस्पर्शी प्रतिक्रिया येत आहेत.

फूड डिलिव्हरी करणाऱ्या महिलेचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ
फूड डिलिव्हरी करणाऱ्या महिलेचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ (Instagram/vishvid )

देशभरात ऑनलाइन जेवण मागवण्याची क्रेझ वाढली असून लोक घरबसल्या आपल्या आवडत्या रेस्टारंटमधील जेवण ऑर्डर करू शकतात. पण ग्राहकांपर्यंत ऑर्डर पोहोचण्यासाठी डिलिव्हरी एजंट किती मेहनत घेतात, याची कुणी कल्पना केली नसेल. ट्रॅफिकशी झुंज देण्यापासून ते कडक उन्ह, असे असंख्य आव्हानांना त्यांना सामोरे जावे लागते. सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात एक झोमॅटो महिला आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कशाप्रकारे फूड डिलिव्हरी करते, हे पाहायला मिळत आहे.

कंटेंट क्रिएटर @vishvid यांनी इन्स्टाग्रामवर एका फूड डिलिव्हरी करणाऱ्या महिलेचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ गुजरातमधील राजकोटमधील असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडिओ एक महिला आपल्या बाईकच्या मागच्या बाजूला झोमॅटो डिलिव्हरी बॉक्स लावून बाईक चालवताना दिसत आहे. तर, तिचे मूल बाईकवर समोर बसलेले आहे. ही महिला आपल्या मुलाला सोबत घेऊन घरोघरी जेवण पोहोचवत आहे.

गेल्या महिनाभरापासून डिलिव्हरी पार्टनर म्हणून काम करणाऱ्या या महिलेने आपण हॉटेल मॅनेजमेंटची विद्यार्थिनी असल्याचे सांगितले. लग्नानंतर तिला नोकरी मिळणे अवघड झाले, याचे मुख्य कारण मुलासोबत काम सांभाळण्याचे आव्हान होते. यामुळे तिने फूड डिलिव्हरी करण्याचा विचार केला. ‘मी अनेक ठिकाणी नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला, पण मला मूल आहे म्हणून त्यांनी मला नाकारले. मग मी विचार केला की, माझ्याकडे बाईक आहे, मग मी माझ्या मुलाला सोबत का नेऊ शकत नाही?’ असे त्या महिलेने सांगितले. ‘आपण सुरु केलेल्या कोणत्याही कामात सुरुवातीला अडचणी येतात. पण आता मला हे आव्हानात्मक वाटत नाही. 'कोणतेही काम मोठे किंवा लहान नसते. तुम्ही हे सगळे करू शकता, असा प्रेरणादायी मेसेज तिने दिला.

नेटकऱ्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया

या व्हिडिओवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या व्हिडिओवर कमेंट करताना एका व्यक्तीने म्हटले आहे की, हे अविश्वसनीय आहे. तिने सिद्ध केले आहे की, आई कोणत्याही आव्हांनाना सामोरे जाऊ शकते. दुसऱ्या व्यक्तीने म्हटले आहे की, आईसारखे दुसरे दैवत जगात नाही, पण सर्वांनी तितकेच कणखर आणि दृढ निश्चयी असायला हवे. आणखी एका व्यक्तीने लिहिले आहे की, कुटुंब अडचणीत असताना आव्हानांना सामोरे जाणाऱ्या या स्त्रीबद्दल आदर आहे.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर