मनुष्य लहान असो की मोठा, श्रीमंत असो की गरीब प्रत्येकाची इच्छा असते की, त्याचा वाढदिवस खास पद्धतीने साजरा केला जावा. कोणतरी त्याला सरप्राइज द्यावे. बालपणी घरचे लोक व मित्र वाढदिवस साजरा करत असतात. मात्र नोकरी करताना व आयुष्याच्या घाईगडबरीत असे करणे शक्य होत नाही. मात्र जेव्हा अनोळखी व्यक्ती आपल्याला असे खास फिलिंग देतात, तेव्हा खूप आनंद होतो. अशीच खुशी एका डिलिव्हरी बॉयला झाली. त्याला काही लोकांनी खास सरप्राइज दिले ज्यांच्यासाठी तो जेवण घेऊन आला होता.
वाढदिवसादिवशी काम करणाऱ्या झोमॅटो डिलिव्हरी बॉयला ड्युटीवर असताना एक हृदयस्पर्शी सरप्राईज मिळाले. अहमदाबादमध्ये मुसळधार पावसात जेवणाची डिलिव्हरी करताना ग्राहकांना त्याचा वाढदिवस असल्याचे लक्षात आले आणि त्यांनी त्याला सरप्राईज देण्याचा निर्णय घेतला. या हृदयस्पर्शी क्षणाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून, तो अनेकांच्या हृदयाला भिडला आहे.
या व्हिडिओमध्ये दिसते की, ग्राहकांना जेव्हा समजते की, आपल्यासाठी जेवण घेऊन येणाऱ्या डिलिव्हरी एजंटचा वाढदिवस आहे. मुसळधार पावसात तो कसा काम करतोय हे पाहिल्यावर ते त्याला सरप्राइज देण्याचा निर्णय घेतात. एजंट जेव्हा त्यांच्या दारात येतो, तेव्हा घरातील तिघे जण त्याच्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छांचे गाणे गातात. त्यासोबतच ते त्याला गिफ्टही देतात आणि त्याला शुभेच्छाही देतात.
हे सरप्राइज पाहून डिलिव्हरी बॉयला धक्का बसतो, मात्र दुसऱ्याच क्षणी त्याच्या चेहऱ्यावर हास्य पसरते. हा व्हिडिओ शेअर करताना आकिब शेखने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, आणि आम्ही त्याच्या चेहऱ्यावर आनंद पाहिला.
हा व्हिडिओ आठवडाभरापूर्वी शेअर करण्यात आला होता. पोस्ट केल्यापासून त्याला जवळपास २० लाख व्ह्यूज मिळाले आहेत. या शेअरवर असंख्य लाईक्स आणि कमेंट्सही आहेत.
यावर लोकांनी अनेक कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. एका व्यक्तीने लिहिले, “माय गॉड हे खूप आरोग्यदायी आहे.” रोहित ठाकूर नावाच्या आणखी एका इन्स्टाग्राम युजरने कमेंट केली की, आम्हाला तुमच्यासारख्या लोकांची गरज आहे.
एके दिवशी, मी इन्स्टामार्टमधून ऑर्डर केली आणि त्यानंतर लगेचच मी पाहिले की बाहेर पाऊस पडत आहे. मला त्याचं वाईट वाटलं. तो अवघ्या २ मिनिटांत येत असल्याने मी ऑर्डर रद्द करू शकले नाही. मला किराणा सामान दिल्यानंतर तो पुन्हा परत आला कारण तो माझ्या काही वस्तू ही मला द्यायला विसरला होता, जरी माझ्या लक्षात आले नाही, असे प्रेरणा नावाच्या युजरने म्हटले आहे.
चौथा युजर म्हणाला, मी पहिल्यांदाच डिलिव्हरी बॉयला शिवीगाळ करण्याऐवजी सन्मानित होताना पाहिलं आहे."