Zomato च्या डिलिव्हरी बॉयने रस्त्यातच मारला कस्टमरच्या स्नॅक्सवर ताव, व्हिडिओ व्हायरल
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Zomato च्या डिलिव्हरी बॉयने रस्त्यातच मारला कस्टमरच्या स्नॅक्सवर ताव, व्हिडिओ व्हायरल

Zomato च्या डिलिव्हरी बॉयने रस्त्यातच मारला कस्टमरच्या स्नॅक्सवर ताव, व्हिडिओ व्हायरल

Updated Mar 19, 2024 05:59 PM IST

Zomatodelivery boy Viral Video : बंगळुरुच्या ट्रॅफिक सिग्नलवरएकZomatoडिलिवरी अजेंट कस्टमरसाठी पॅककेलेले जेवण खाताना दिसून आला.

Zomato delivery boy
Zomato delivery boy

Zomato Viral Video : बंगळुरुच्या ट्रॅफिक सिग्नलवर एक Zomato डिलिवरी अजेंट कस्टमरसाठी पॅक केलेले जेवण खाताना दिसून आला. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणाक व्हायरल झाला आहे. क्लिपमध्ये दिसत आहे की, डिलीवरी बॉय ट्रॅफिकमध्ये अडकला आहे. हा डिलिव्हरी बॉय हात मागे घेऊन झोमॅटो डिलीवरी बॉक्समध्ये हात टाकतो. बॉक्समधून फ्रेंच फ्राइज काढून खात आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पुन्हा एकदा कंपनीच्या फूड सेफ्टी प्रोसीजरवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना अनेक फेसबुक यूजर्सने म्हटले की, फूड पॅकेजेसमध्ये नेहमी काहीतरी गडबड दिसत आहे. दरम्यान दुसऱ्या यूजरने इशारा दिला की, वेंडर्सनी जेवणाचे पॅकेट चांगल्या पद्धतीने सील करून द्यावे, जेणेकरून त्या पॅकेटची छेडछाड केली जाणार नाही. अन्य एका यूजरने म्हटले की, अशा घटना होत असतात, याच्या तक्रारीही दाखल केल्या जातात, मात्र झोमॅटो कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही.

सोशल मीडियावर गतीने व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ अनेक लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडिओ बंगळुरूमधील असल्याचे म्हटले जात आहे. मात्र हिन्दुस्तान टाइम्स मराठी या व्हिडिओच्या सत्यतेची पुष्टी करत नाही.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर लोकांनी अनेक कमेंट केल्या आहेत. लोकांनी चिंता व्यक्त केली की, अशा पद्धतीने ग्राहकापर्यंत साफ आणि स्वच्छ भोजण कसे पोहोचणार?

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर