Viral News: झोमॅटोकडून चुकीची फूड डिलिव्हरी, ग्राहकानं तक्रार केल्यानंतर म्हणाले...; ऐकून बसेल धक्का!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News: झोमॅटोकडून चुकीची फूड डिलिव्हरी, ग्राहकानं तक्रार केल्यानंतर म्हणाले...; ऐकून बसेल धक्का!

Viral News: झोमॅटोकडून चुकीची फूड डिलिव्हरी, ग्राहकानं तक्रार केल्यानंतर म्हणाले...; ऐकून बसेल धक्का!

Oct 15, 2024 03:00 PM IST

Zomato: झोमॅटोने आपल्या ग्राहकाला चुकीची फूड डिलिव्हरी केल्यानंतर काय म्हणाले? वाचा

झोमॅटोकडून चुकीची फूड डिलिव्हरी, ग्राहकानं तक्रार केल्यानंतर म्हणाले
झोमॅटोकडून चुकीची फूड डिलिव्हरी, ग्राहकानं तक्रार केल्यानंतर म्हणाले

Zomato News: झोमॅटोने हैदराबादच्या एका विद्यार्थिनीला चुकीची फूड ऑर्डर दिली आणि नंतर तक्रार केल्यावर तिला 'प्लीज घ्या' असे सांगितले. हैदराबाद येथील तरुणीने झोमॅटोच्या माध्यमातून चिकन मंचूरियनची ऑर्डर दिली. मात्र, फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मद्वारे तिला चिकन ६५ ची डिलिव्हरी करण्यात आली.  त्यानंतर तरुणीने झोमॅटो कस्टमर केअर प्रतिनिधीशी संपर्क साधला.  परंतु, झोमॅटोने या तरुणीची मदत करण्याऐवजी तिला चुकीची डिश घेण्याची विनंती करण्यात करण्यात आली.

झोमॅटोच्या प्रतिनिधीशी झालेल्या संभाषणाच्या स्क्रीनशॉटनुसार, संबंधित तरुणीने लिहिले की, ‘मी चिकन ६५ नव्हे तर चिकन मंचूरिया ऑर्डर केले.’ पाच मिनिटानंतर कस्टमर केअर एक्झिक्युटिव्हने उत्तर दिले की ‘आम्ही तुम्हाला विनंती करतो की कृपया ते घ्या... आम्हाला खात्री आहे की, ही डिश तुम्हाला नक्की आवडेल.’ 

या संभाषणाचा स्क्रिनशॉर्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या पोस्टला एका दिवसात सुमारे पाच लाख लोकांनी लाईक्स केले आहे. तर, हजारो लोकांनी या पोस्टवर आपली प्रतिक्रिया दिली. झोमॅटोने या पोस्टला उत्तर देताना लिहिले की, 'हाय अनन्या, तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल आम्हाला खरोखर खेद आहे. तुमचा रजिस्टर्ड फोन नंबर/ ऑर्डर आयडी असलेला डीएम आम्हाला पाठवा. आम्ही याबाबत शोध घेऊ.

नेटकऱ्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया

एका व्यक्तीने लिहिले की, ‘झोमॅटो कस्टमर केअर ही एक गंमत आहे. म्हणून मी स्विगीकडे वळलो आहे.’ एक्स युजर झोमॅटोच्या सीईओला टॅग करत लिहिले की, ‘ दीपिंदर गोयल, शेअर होल्डर्सना खूश ठेवण्यासाठी नफ्याच्या मागे डोळे झाकून धावण्यापेक्षा तुमचा कस्टमर केअर रिस्पॉन्स सुधारा.’

नदीत बुडणाऱ्या दाम्पत्याचा व्हिडिओ व्हायरल

लखनऊमधील तुळशी घाटात गंगा नदीत स्नान करताना मोहित तिवारी आणि त्याची पत्नी थोडक्यात बचावले. हा व्हिडिओ सोमवारी इंटरनेटवर व्हायरल झाला. माहिती मिळताच कुटुंबीयांनी फोन करून त्यांची प्रकृती जाणून घेतली.

सोशल मीडियावरील व्हिडिओ पाहून लोकांनी पाणी पोलीस कर्मचाऱ्यांचे कौतुक करत त्यांना प्रोत्साहन दिले. वाराणसी जल पोलीस प्रभारी मिथलेश यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहित तिवारी आणि त्यांची पत्नी नेहा त्रिपाठी ठाकूरगंज हून वाराणसीला भेट देण्यासाठी आले होते. रविवारी सकाळी सव्वानऊ वाजता नेहा तुळशी घाटात आंघोळीसाठी नदीत उतरली. पण खड्ड्यात पाय पडल्याने ती पाण्यात बुडाली. तिला बुडताना पाहून मोहित बचावासाठी नदीत उतरला. पण तोही पाण्यात बुडू लागला. हे पाहून जलपोलीस कर्मचारी रामजी साहनी आणि मनोज साहू यांनी गंगा नदीत उडी मारून दोघांना वाचवले.

 

 

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर