cockroach in sandwich : झोमॅटोवरून ऑर्डर केलेल्या सँडविचमध्ये आढळलं झुरळ; पाहून नेटकरी संतापले!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  cockroach in sandwich : झोमॅटोवरून ऑर्डर केलेल्या सँडविचमध्ये आढळलं झुरळ; पाहून नेटकरी संतापले!

cockroach in sandwich : झोमॅटोवरून ऑर्डर केलेल्या सँडविचमध्ये आढळलं झुरळ; पाहून नेटकरी संतापले!

Mar 21, 2024 03:47 PM IST

Zomato Customer Finds Cockroach Inside Sandwich: झोमॅटोवरून ऑर्डर केलेल्या सँडविचमध्ये झुरळ आढळल्याने ग्राहकाला मोठा धक्का बसला आहे.

ग्राहकाने फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवरून ऑर्डर केलेल्या सँडविचमध्ये झुरळ आढळले.
ग्राहकाने फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवरून ऑर्डर केलेल्या सँडविचमध्ये झुरळ आढळले. (Reddit/@NomadicGeek1)

Cockroach Finds In Zomato Order: बंगळुरुत झोमॅटोवरून ऑर्डर केलेल्य सँडविचमध्ये झुरळ आढळल्याने ग्राहकाला चांगलाच धक्का बसला आहे. ग्राहकाने रेडिटवर हा प्रकार सांगितला आणि ऑर्डर केलेल्या सँडविचचा फोटोही पोस्ट केला. सँडविचमध्ये झुरळ दाखवणारी पोस्ट व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

रेडिट युजर 'नोमॅडिकगीक १' आपल्या अकाऊंटवरून याबाबत पोस्ट केली. या फोटोच्या कॅप्शनमध्ये 'फ्रेशमेन्यू, झोमॅटोवरून संजय नगर येथून ऑर्डर केलेल्या सँडविचमध्ये झुरळ आढळले' असे लिहिण्यात आले. या फोटोमध्ये सँडविच खाल्लेले दिसत आहे. ही पोस्ट काही तासांपूर्वीच रेडिटवर शेअर करण्यात आली. या पोस्टवर नेटकऱ्यांच्या संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत.

एका युजरने लिहिले की, "स्विगी/झोमॅटोवरील कोणत्याही क्लाऊड किचनपासून दूर राहणे चांगले. दुसऱ्या युजरने लिहिले की, क्लाऊड किचनमधून मागवलेल्या सूपमध्ये आणि प्रसिद्ध नंदिनी रेस्टॉरंटमधून मागवलेल्या बिर्याणीत मला अनेकदा झुरळं सापडली. तिसरा युजर म्हणतोय की, मला एवढेच माहित आहे की, खूप कमी हॉटेलमध्ये स्वच्छतेचे पालन केले जाते. बाहेरचे अन्न खाणे टाळणे, हाच समजूतदारपणा आहे.

प्रसिद्ध कॅफेतील डोसामध्ये आढळले झुरळ

यापूर्वी दिल्लीतील प्रसिद्ध कॅफे मद्रास कॉफी हाऊसमध्ये एका ग्राहकाने ऑर्डर केलेल्या डोसामध्ये चक्क ८ मेलेली झुरळं सापडली. इशानी नावाची महिला तिच्या मैत्रिणीसोबत भोजनगृहात गेली आणि साधा डोसा मागवला, ज्यात झुरळं आढळले. हे पाहून संबंधित महिलेला धक्का बसला. त्यानंतर महिलेने तिच्या व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सांगितले. पण व्हिडिओ रेकॉर्ड होण्यापूर्वीच रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या टेबलवरील डोसाची प्लेट काढून घेतली. ही घटना ७ मार्च रोजी २०२४ घडल्याचे सांगण्यात येत आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर