Viral Video: पेट्रोल मिळाले नाही म्हणून झोमॅटो बॉयची चक्क घोड्यावरून डिलिव्हरी, व्हिडिओ व्हायरल-zomato boy riding horse to deliver orders in hyderabad video goes viral ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video: पेट्रोल मिळाले नाही म्हणून झोमॅटो बॉयची चक्क घोड्यावरून डिलिव्हरी, व्हिडिओ व्हायरल

Viral Video: पेट्रोल मिळाले नाही म्हणून झोमॅटो बॉयची चक्क घोड्यावरून डिलिव्हरी, व्हिडिओ व्हायरल

Jan 03, 2024 04:10 PM IST

Zomato Delivery Viral Video: झोमॅटो बॉयचा घोड्यावरून डिलिव्हरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर धूमाकूळ घालत आहे.

Zomato Viral Video
Zomato Viral Video

Zomato Horse Delivery Video: केंद्र सरकारच्या नव्या वाहन कायद्या विरोधात म्हणून देशभरातील वाहनचालकांनी संप पुकारला. परिणामी, वाहनात पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी पंपाबाहेर लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, पेट्रोल मिळत नसल्याने झोमॅटो बॉयने आपल्या ग्राहकांना वेळत डिलिव्हरी पोहोचवण्यासाठी भन्नाट पर्याय शोधून काढला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

एकिकडे पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी वाहनधारकांची झुंबड पाहायला मिळत आहे. दुसरीकडे, झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय आपल्या ग्राहकांना वेळत जेवण पोहोचवण्यासाठी घोड्यावर स्वार होऊन डिलिव्हरी करताना दिसत आहे. झोमॅटो बॉयचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ हैदराबादमधील चंगलचुडा भागातील असल्याचे सांगण्यात येत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ दिसत आहे. याच गर्दीत झोमॅटो टी-शर्ट घातलेला एक तरुण पाठीवर डिलिव्हरी बॅग घेऊन चक्क घोड्यावरुन प्रवास करताना दिसत आहे. पेट्रोल मिळत नसल्याने डिलिव्हरी बॉयची आयडिया पाहून सगळेच आश्चर्यचकीत झाले आहेत.

या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी लाईक्स केले आहे. तर, बऱ्याच लोकांनी डिलिव्हरी बॉयचे कौतूक करत व्हिडिओवर भन्नाट अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र, हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.

विभाग