मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Zika virus Guidelines : झिका व्हायरसचा धोका वाढला! ICMR कडून नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी, ‘ही’ तपासणी करण्याचा सल्ला

Zika virus Guidelines : झिका व्हायरसचा धोका वाढला! ICMR कडून नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी, ‘ही’ तपासणी करण्याचा सल्ला

Jul 10, 2024 09:31 PM IST

Zika virus Guidelines :आयसीएमआरने सर्व राज्यांना झिकाची स्क्रीनिंग वाढवणे तसेच याचे संक्रमण नियंत्रणात ठेवण्यासाठी सतर्कतेचे निर्देश दिले आहेत.

झिका व्हायरसचा धोका वाढला!
झिका व्हायरसचा धोका वाढला!

Zika virus cases : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात तसेच देशभरात झिका व्हायरसच्या रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे.देशातील अनेक राज्यात या व्हायरसच्या संक्रमणाचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद (ICMR)ने झिका व्हायरसबाबत नव्या गाईडलाइन्स जारी केल्या आहेत. यामध्ये राज्यांना डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या तपासण्या वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. आयसीएमआरने सर्व राज्यांना झिकाची स्क्रीनिंग वाढवणे तसेच याचे संक्रमण नियंत्रणात ठेवण्यासाठी सतर्कतेचे निर्देश दिले आहेत.

भारतात झिका व्हायरसचा प्रसार मोठा प्रमाणात होत नसला तरी आयसीएमआरने हे निर्देश जारी केले आहेत. तज्ज्ञांनी सांगितले की, देशातील जवळपास सर्व राज्यात मान्सून सक्रीय झाला आहे. त्यामुळे झिका व्हायरसच्या प्रकरणांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या आजाराच्या बचावासाठी पावले उचलली जात आहेत. झिका मच्छर चावल्यामुळे पसरतो व पावसात या व्हायरलच्या डासांची उत्पत्ती होते. यामुळे आयसीएमआरने नव्या गाईडलाइन जारी केल्या आहेत. यामध्ये म्हटले आहे की, राज्यांनी डेंगू आणि चिकनगुनियाचे लक्षणे असणाऱ्या रुग्णांची झिका व्हायरस टेस्टही केली जावी.

ट्रेंडिंग न्यूज

काय आहेझिकाव्हायरस व याची लक्षणे?(Zika virus symptoms)

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार झिका व्हायरल एडीज मच्छर चावल्यामुळे पसरतो. हा मच्छर डेंगू आणि चिकनगुनियाही पसरतो. दरम्यान डेंगूच्या तुलनेत झिका व्हायरसची लक्षणे सौम्य असतात. त्वचेवर लाल व्रण, डोळे लाल होणे, सांधे दुखी, अंगदुखी, डोकेदुखी आदि लक्षणे झिका व्हायरसची दिसून येतात.हा व्हायरस पहिल्यांदा १९४७ मध्ये युगांडामध्ये आढळला होता.

देशातील बहुतांश राज्यांमध्ये मान्सून दाखल झाला आहे. त्यामुळे झिका व्हायरसच्या रुग्णांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. झिका व्हायरस डासांच्या चावण्याने देखील पसरतो आणि हा व्हायरस पसरवणारे डास पावसात प्रजनन करू शकतात.

व्हायरसची लागण झालेल्या काहींना रुग्णालयातही दाखल करावं लागतं. ज्या लोकांना या व्हायरसने ग्रासले आहे त्यांनी आराम करणे गरजेचे आहे. याच्या लक्षणांमध्ये डोकेदुखी, ताप, शरीरावर लाल रंगाचे चट्टेही दिसतात.

WhatsApp channel
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर