Hindu protest in dhaka : बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ले अद्याप थांबलेले नाहीत. यामुळे नवनियुक्त युनूस सरकार विरोधात बांग्लादेशांतील हिंदूंनी एल्गार पुकारला आहे. मोठ्या प्रमाणात हिंदूंनी ढाका येथे जमत सरकार विरोधात आंदोलन केले. यावेळी शेख हसीना यांच्यानंतर आलेले शांततेचे नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांना हिंदूंचे संरक्षण करता येत असल्याने त्यांनी त्यांचा निषेध केला.
बंगलादेशात सत्तापालट झाल्यावर मोठ्या प्रमाणात हिंदू समाजावरील अत्याचार वाढले आहे. तेथील हिंदूच्या नोकऱ्या बळजबरीने हिरावून घेतल्या जात आहेत. या सर्व समस्यांना तोंड देत तब्बल ३० हजारांहून अधिक हिंदू नागरिक संख्येने रस्त्यावर उतरले आहेत. यावेळी त्यांनी सुरक्षा आणि छळ थांबवण्याच्या मागणी केली तसेच हिंदू नेत्यांवरील देशद्रोहाचे गुन्हे मागे घेण्याची मागणीही करण्यात आली.
सेक्युलर शेख हसीना सरकार गेल्यानंतर देशात हिंदूंवरील अत्याचार वाढल्याचे हिंदू संघटनांचे म्हणणे आहे. त्यांच्यावरील हल्ले, छळाच्या घटना झपाट्याने वाढल्या आहेत. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून हिंदूंवर अशा प्रकारचे हजारो गुन्हे दाखल झाले आहेत. चटगांव येथे देखील मोठे आंदोलन करण्यात आले. तर देशातील विविध शहरात अल्पसंख्याकांनीही सरकारविरोधी निदर्शने केली.
बांगलादेश हिंदू-बौद्ध ख्रिश्चन युनिटी कौन्सिल या अल्पसंख्याक गटाने सांगितले की, ऑगस्टपासून हल्ल्याच्या दोन हजारांहून अधिक घटना घडल्या आहेत. अंतरिम सरकार अल्पसंख्यांकांना संरक्षण देण्यास असमर्थ ठरले आहेत.
हसीना सरकार गेल्यापासून बांगलादेशातील विविध शहरांमध्ये हिंदू संघटना सातत्याने निदर्शने करत आहेत. त्यांच्या आठ प्रमुख मागण्या आहेत. अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र मंत्रालय, अत्याचारांवर खटला चालवण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय आणि न्यायालयीन प्राधिकरण हवे आहे. तसेच दुर्गापूजेसाठी पाच दिवस सुट्टी देण्यात यावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
बांगलादेशात शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतरच आंदोलक आणि कट्टरतावाद्यांनी हिंदू समाजाला लक्ष्य केले जात आहे. हिंदू धर्मियांची दुकाने जाळण्यात आली, हिंदू महिला, महिलांवर अत्याचार करण्यात आले. घरांवर हल्ले झाले, आस्थापना जाळल्या गेल्या. यात हजारो हिंदू मारले गेले. ऑगस्टमहिन्यापासून हा सर्व प्रकार सुरू आहे.
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या सरकारमध्ये सहभागी असलेल्या पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाला गुरुवारी रात्री झालेल्या संघर्षानंतर आग लावण्यात आली. पक्ष कार्यालयाचे नुकसान करण्यात आले. हा पक्ष हसीना सरकारचा भाग होता आणि देशातील प्रमुख पक्ष बीएनपीने बहिष्कार टाकूनही गेल्या तीन सार्वत्रिक निवडणुका लढविल्या. दिवंगत राष्ट्राध्यक्ष हुसेन मोहम्मद इर्शाद यांनी स्थापन केलेला हा जातीय पक्ष बांगलादेश अवामी लीगच्या नेतृत्वाखालील आघाडीचा पक्ष होता. या पक्षाने शनिवारी ढाक्यात रॅली काढणार असल्याचे जाहीर केल्यानंतर हा गदारोळ सुरू झाला. हसीना सरकारचा निषेध करणाऱ्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी त्यांच्याविरोधात रॅली काढली होती. ढाक्याच्या मध्यभागी असलेल्या काकरैल भागात जटिया पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर आंदोलकांनी मशाल घेऊन आंदोलन केले, तेव्हा काही आंदोलकांनी पक्षाच्या कार्यालयांची तोडफोड केली. तसेच पक्षाचे संस्थापक इरशाद यांचे छायाचित्र असलेल्या भिंतीवर शाई फेक केली.