Viral news : अमेरिकेतील प्रसिद्ध फूड यूट्यूबर निकोलस पेरीने आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सात महिन्यात ११४ किलोपेक्षा जास्त वजन कमी केल्याचा दावा केला आहे. पॅरीच्या खुलाशांमुळे त्याच्या प्रेक्षकांना धक्का बसला आहे. पेरी यूट्यूबवर फूड व्हिडिओ ब्लॉगर असून तो जास्त खाण्यासाठी प्रसिद्ध आहे. हा त्याचा आतापर्यंतचा सर्वात मोठा सोशल मीडिया प्रयोग असल्याचं त्यानं त्याच्या नुकत्याच उपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. पेरीच्या खुलाशांमुळे प्रेक्षकही आश्चर्यचकित झाले आहेत. कारण या दोन वर्षांतही तो सतत त्याचे व्हिडिओ पोस्ट करत होता, ज्यामध्ये तो पूर्वीसारखाच लठ्ठ दिसत आहे. पेरी ने हे कसे केले ही त्याने प्रेक्षकांना सांगितले आहे.
अमेरिकेतील प्रसिद्ध यूट्यूबर निकोलस पुरन याला त्याचे चाहते 'निकोकाडो एवोकॅडो' म्हणूनही ओळखतात. निकोलसचे यूट्यूबवर ४.१९ दशलक्षाहून अधिक यूझर आहेत. त्याने एक दिवसापूर्वी पोस्ट केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत २९ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. निकोलसने आपल्या नवीन व्हिडिओमध्ये वजन कमी करण्याबाबत मोठा खुलासा करून प्रेक्षकांना चकित केले आहे.
खवय्या म्हणून दर्शकांमध्ये प्रसिद्ध असलेल्या पेरीने सांगितले की, त्याने गेल्या ७ महिन्यांपासून गुप्तपद्धतीने २५० पौंड (सुमारे ११४ किलो) वजन कमी केले आहे. हे लपून करण्याचे कारण देखील त्यानं सांगितलं आहे. या काळात त्यानं सोशल मीडियावर नियमितपणे पोस्ट देखील केल्या. असे असतांनाही प्रेक्षकांना त्याचे वजन कमी झाल्याचेही लक्षात आले नाही. त्यानं सांगितलं की, त्याने २ वर्षांपासून कोणताही नवीन व्हिडिओ बनवला नाही, परंतु त्याच्या प्रकृतीवर लक्ष केंद्रित करत आपले चॅनल सुरू ठेवण्यासाठी जून व्हिडिओ पोस्ट करत राहिला.
पेरीने 'टू स्टेप्स अहेड' या व्हिडिओमध्ये, त्याने वजन कमी करण्याच्या प्रवासात प्री-रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओंद्वारे चाहत्यांना मूर्ख बनवल्याचे कबूल केले. व्हिडिओच्या सुरुवातीला पेरीने पांडाचे डोके घातले होते. तो म्हणाला, "मी नेहमी दोन पावले पुढे असतो."
पेरी म्हणाला, त्याचा वजन कमी करण्याचा हा प्रवास वैयक्तिक होता. त्याने याला त्याच्या संपूर्ण आयुष्यातील सर्वात मोठा सामाजिक प्रयोग म्हटले आहे. दुसऱ्या यूट्यूब चॅनेलवर शेअर केलेल्या "हाय" नावाच्या वेगळ्या व्हिडिओमध्ये, पेरी त्याच्या पोस्टवर मजा करतांना दिसला.