मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 18, 2024 11:09 PM IST

Crime News : तरुणाने एकाच कुटूंबातील पाच लोकांची धारदार शस्त्राने हत्या केल्यानंतर स्वत:ही गळफास घेत आत्महत्या केली.या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले
लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले

छत्तीसगडमध्ये एकाच कुटंबातील ६ लोकांच्या हत्याकांडाचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. तरुणाने एकाच कुटूंबातील पाच लोकांची धारदार शस्त्राने हत्या केल्यानंतर स्वत:ही गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. पोलीस व फोरेंसिक टीम घटनास्थळी दाखल झाली असून प्रकरणाचा तपास केला जात आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

छत्तीसगड राज्यातील सारंगड जिल्ह्यातील थरगावमध्ये एकाच कुटूंबातील पाच लोकांची हातोडी व छन्नीने वार करून निर्घृण हत्या केली. या हत्याकांडानंतर आरोपीने स्वत:ही गळफास घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला. 

मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा मुख्यालयापासून जवळपास २२ किलोमीटर दूर सलीहा थाना क्षेत्रातील थरगाव येथे ही घटना घडली. येथे एकाच कुटूंबातील ५ लोकांची हत्या करण्यात आली. सांगितले जात आहे की, आरोपी तरुणाचे या घरातील तरुणीसोबत लग्न ठरवले होते. मात्र काही कारणामुळे घरच्या लोकांनी लग्नास नकार दिला. यामुळे नाराज झालेल्या तरुणाने मुलीच्या घरातील सर्व सदस्यांची हत्या करून स्वत:ही गळफास घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच बिलाईगड-सारगड जिल्ह्याचे एसपी यांनी पोलीस व फॉरेंसिक टीम घटनास्थळी रवाना केली. 

पोलिसांनी सांगितले की, हे प्रकरण प्रेमप्रकरणाशी संबंधित आहे. मृतांमध्ये हेमलाल (५२), जगमती (२७ वर्ष),  मीरा आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. 

पाकिस्तानात असती तर तुझं मी अपहरण केलं असतं! 

कॅनडामध्ये चालक आणि महिला प्रवासी यांच्यातील संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दोघांमधील हे संभाषण सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. कॅब ड्रायव्हर महिलेला सांगतो की जर ती पाकिस्तानात असती तर त्याने स्वतःच तिचे अपहरण केले असते. चालक हा मूळचा पाकिस्तानचा असल्याचे समजते.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये ड्रायव्हर म्हणतो, तू जर पाकिस्तानात असती तर मी तुझे अपहरण केले असते. रिपोर्ट्सनुसार हा व्हिडिओ टोरंटोचा आहे. व्हिडिओमध्ये ड्रायव्हर आधी म्हणतो, जर तुझा जन्म पाकिस्तानात झाला असता तर मी तुझे अपहरण केले असते. यावर आश्चर्य व्यक्त करत महिला म्हणते, तुम्ही माझे अपहरण केले असते का? यावर ड्रायव्हर उत्तर देतो, अर्थातच, कारण माझ्याकडे तुला मिळवण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग नाही.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग