मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  आपल्याच पत्नीचा मुलगा बनला तरुण, ७ वर्षानंतर समोर आली सासरा-सुनेमधील अनैतिक संबंधाची कहाणी

आपल्याच पत्नीचा मुलगा बनला तरुण, ७ वर्षानंतर समोर आली सासरा-सुनेमधील अनैतिक संबंधाची कहाणी

Jul 08, 2024 05:07 PM IST

Viral News : एका महिलेने घरातून पळून जाऊन सासऱ्याशीच विवाह केला. अशा पद्धतीने तिचा पती आता मुलगा बनला आहे. हा अजब प्रकार बदायूं जिल्ह्यात समोर आला आहे.

७ वर्षानंतर समोर आली सासरा-सुनेमधील संबंधाची कहाणी
७ वर्षानंतर समोर आली सासरा-सुनेमधील संबंधाची कहाणी

लग्नानंतर पती-पत्नीमध्ये वाद तसेच प्रियकरासोबत पळून जाण्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. मात्र यूपीमधील बदायूं जिल्ह्यात समोर आलेला प्रकार ऐकून डोक्यावर हात माराल. सात वर्षापूर्वी एका महिलेचा विवाह झाला होता. लग्नानंतर एक वर्षभर सर्वकाही सुरळीत चालले होते. मात्र अचानक महिला घरातून बेपत्ता झाली होती. महिलेच्या पतीने पत्नीचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला मात्र तिचा काहीच सुगावा लागला नाही.

काही दिवसानंतर महिलेचा सासराही घरातून अचानक बेपत्ता झाला. सासरा व सूनेने एकमेकांशी विवाह केला होता. याची महिलेच्या पतीला काहीच कल्पना नव्हती. सात वर्षानंतर याचा खुलासा झाला. त्यानंतर तरुणाने आपल्या डोक्यालाच हात लावला. तरुण आपल्याच पत्नीचा मुलगा बनला होता. याची तक्रार तरुणाने पोलिसांत दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी दोघांना पकडून ठाण्यात आणले.

ट्रेंडिंग न्यूज

चौकशीत महिलेने सांगितले की, जेव्हा तिचा विवाह झाला होता, तेव्हा तिचा पती अल्पवयीन होता. ती आपल्या पतीसोबत नेहमी त्रस्त असे. त्यामुळे ती आपल्या सासऱ्यासोबत घरातून पळून गेली व त्यांच्यासोबत लग्न केले. दोघे दुसऱ्या गावात जाऊन राहू लागले. महिलेने सांगितले की, तिचा विवाह सात वर्षापूर्वी झाला होता. मात्र तिला तो विवाह मान्य नव्हता. आता आपल्या सासऱ्याशी लग्न करून खुश आहे. दोघे आपल्या मर्जीने विवाह करून दाम्पत्य जीवन जगत आहेत. पोलिसांनी दोघांची कहानी ऐकून त्यांना सोडून दिले.

आधी पत्नीला व नतंर वडिलांना शोधत राहिला तरुण -

हा प्रकार बदायूं जिल्ह्यातील दबतोरी चौकी क्षेत्रातील आहे. येथे राहणाऱ्या एका तरुणाने पोलिसांना सांगितले की, २०१६ मध्ये वजीरगंज येथे राहणाऱ्या तरुणीसोबत त्याचा विवाह झाला होता. मात्र एक वर्षानंतर पत्नी घरातून बेपत्ता झाली होती. काही दिवस तो पत्नीला शोधत होता. दरम्यान त्याचा वडीलही घरातून बेपत्ता झाला. तरुणाने दोघांचा खूप शोध घेतला मात्र त्यांचा काही ठावठिकाणा समजला नाही. काही दिवसापूर्वी वडील व पत्नी चंदौसी येथे रहात असल्याचे समजताच त्याने पोलिसात सूचना दिली. पोलिसांनी दोघांना शोधून काढले. सासऱ्याने आपल्याच सुनेसोबत लग्न केले होते.

एक खोली भाड्याने घेत दोघे रहात होते. पोलिसांनी दोघांना पकडून ठाण्यात आणले. पतीला सोडून का पळून गेलीस, या प्रश्नावर महिलेने सांगितले की, लग्नावेळी तिचा पती अल्पवयीन होता. त्याचे शिक्षणही झाले नव्हते तसेच तो काही कामधंदाही करत नव्हता.दरम्यान तिचे सासऱ्यासोबत सूत जुळले व दोघे घरातून पळून गेले. दोघांनी कोर्ट मॅरेज करून सोबत राहू लागले. विशेष म्हणजे दोघांना दोन वर्षाचा एक मुलगा आहे. दोघे आपल्या जीवनात खुश आहेत. महिलेने सांगितले की, सासऱ्यासोबत लग्न केल्याचे गावात समजले असते तर खूप बदनामी झाली असती, यामुळे दोघे चंदौसी येथे रहात होते.

WhatsApp channel