मृत्यू कधी, कोणाला व कसा येईल याचा काहीच भरवसा नाही. आयुष्याच्या क्षण भंगूरतेचा प्रकार उत्तर प्रदेश राज्यातील बदायूं येथे घडला आहे. येथे आजारपणामुळे मोठ्या भावाचा मृत्यू झाला. त्यानंतर लहान भाऊ पिंपळाच्या झाडाखाली बसून रजत होता. त्यावेळी अचानक पिंपळाची फांदी खाली पडून त्यांचा मृत्यू झाला. एकाच दिवशी दोन भावांचा मृत्यू झाल्याने कुटूंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याचबरोबर संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
बदायू येथल्या अलापुर पोलीस ठाणे क्षेत्रातील गभियाई नगला गावत ही दुर्घटना घडली. येथे रामसिंह यांचा मोठा भाऊ अनोखे लाल यांचे दीर्घ आजारामुळे निधन झालं. त्यांचे कुटूंबीय व नातेवाईक त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी करत होते. अनोखे लाल यांचा मृतदेह घराजवळच्या भल्या मोठ्या पिंपळाच्या झाडाखाली आणून ठेवला होता. तेथे त्यांचा लहान भाऊ रामसिंह भाऊ गेल्याच्या दु:खात रडत बसले होते. त्यावेळी अचानक पिंपळाच्या झाडाची भली मोठी फांदी त्यांच्या अंगावर कोसळली. यात रामसिंह यांचा जागीच जीव गेला.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या रामसिंह यांचा मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवला. मात्र एकाच कुटुंबातील या दोन भावांचा जीव गेल्यानं सर्वजण हळहळले. या दोन्ही भावांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी उपस्थितांचे डोळे पाणावले. मृत्यू कधी कोणत्या रुपात येईल हे सांगता येत नाही, अशी चर्चा गावकऱ्यांमध्ये सुरू झाली. मोठ्या भावाच्या मृत्यूमुळे रडणाऱ्या रामसिंह यांच्यावरच मृत्यूचं झडप घातली. काही काळापूर्वी भावाच्या मृत्यूने रडणाऱ्या रामसिंह यांना आपल्या मृत्यूची कल्पनाही नसावी. पिंपळाच्या झाडावरील फांदीमुळे त्यांना जीव गमवावा लागला.
या हृदयद्रावक घटनेत लहान भाऊ रामसिंह यांचा जीव गेला. रामसिंह आपल्या मोठ्या भावाच्या मृतदेहाजवळ बसून विलाप करत होता. मात्र दुसऱ्याच क्षणी पिंपळाच्या झाडावरून एक फांदी तुटली व त्यांच्या अंगावर पडली. यात रामसिंह यांचा जीव गेला. याची पंचक्रोशीत चर्चा सुरू आहे.