मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  विधवा वहिणीच्या प्रेमात घर बनलं रणमैदान; छोट्या भावासोबत झाले लग्न, मोठ्या २ भावांनी केली निघृण हत्या

विधवा वहिणीच्या प्रेमात घर बनलं रणमैदान; छोट्या भावासोबत झाले लग्न, मोठ्या २ भावांनी केली निघृण हत्या

Jun 17, 2024 03:09 PM IST

Uttar pradesh Crime News : लहान भावाच्या लग्नामुळे यशवीरचे दोन्ही मोठे भाऊ उदयवीर आणि ओमवीर नाराज होते. यातून त्यांनी गोळी मारून यशवीरची हत्या केली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

विधवा वहिणीच्या प्रेमात घर बनलं रणमैदान
विधवा वहिणीच्या प्रेमात घर बनलं रणमैदान

उत्तर प्रदेशमधील बागपत जिल्ह्यातील गुराना गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाच्या विवाहाने नाराज झालेल्या त्याच्या दोन मोठ्या भावांनी त्याची हत्या केली. शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास ही हत्या झाली. 

पोलिसांनी सांगितले की, मृत तरुणाचे नाव यशवीर (३२) आहे. त्याच्या वडिलाचे नाव ईश्वर आहे. त्यांनी सांगितले की, ईश्वर यांना चार मुले आहेत. सुखबीर, ओमवीर, उदयवीर व यशवीर अशी यांची नावे आहेत. यातील सर्वात मोठा असलेल्या सुखबीरचा विवाह रितु नावाच्या तरुणीशी झाला होता. मात्र विवाहानंतर काही वर्षातच सुखवीर याचा मृत्यू झाला. त्यानंतर घरच्या लोकांनी रितुचा विवाह सर्वात लहान दीर असलेल्या यशवीरशी लावून दिला होता. 

ट्रेंडिंग न्यूज

मोठ्या दोन भावांचेही होते वहिणीवर प्रेम -

पोलिसांनी सांगितले की, लहान भावाच्या लग्नामुळे यशवीरचे दोन्ही मोठे भाऊ उदयवीर  आणि  ओमवीर नाराज होते. यातून त्यांनी गोळी मारून यशवीरची हत्या केली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. 

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार चार भावांपैकी सुखबीर सर्वात मोठा होता. तर ओमवीर (३६),  उदयवीर (३५) आणि यशवीर (३२) होता. सुखबीरच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी रितुच्या माहेरच्या लोकांनी सुखवीरचा सर्वात लहान भाऊ यशवीरसोबत तिचे लग्न लावून दिले. त्यानंतर आजूबाजूचे लोक ओमवीर आणि उदयवीरची मस्करी करू लागले की, तुमची काही लायकीच नाही. तुम्ही दोघे मोठे असताना लहान भावासोबत वहिणीचे लग्न लावून दिले. दरम्यान रितुला सुखवीरपासून ३ तर यशवीरपासून १ मूल आहे. 

दोन्ही भाऊ लोकांच्या ठोमण्यांनी त्रासले होते. कधी याचे उत्तर देत होते तर कधी गप्प बसत होते. यातून छोट्या भावाबद्दलचा द्वेष वाढला होता. यातून त्यांच्यात वाद व झगडे होत होते. दोन महिन्यापूर्वी दोघांनी आई संगीता आणि यशवीरशी भांडण केले होते. त्यावेळी पोलिसांच्या समोरच दोघांनी यशवीरला ठार मारण्याची धमकी दिली होती. मात्र पोलिसांनी हे प्रकरण गंभीरतेने घेतले नाही.

नियोजनबद्ध केलेल्या हत्येत ओमवीर याने यशवीरचा हात पकडला आणि दुसऱ्या भाऊ उदयवीरने यशवीरच्या छातीत गोळी मारली. गोळी लागल्याने यशवीर रक्तबंबाळ होऊन जमिनीवर कोसळला. त्यानंतर जोपर्यंत यशवीरची हालचाल शांत होत नाही, तोपर्यंत त्याला दाबून धरले. यावेळी यशवीरने त्यांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला. यात दोन्ही आरोपी ओमवीर व उदयवीरला किरकोळ दुखापत झाली आहे.

 

WhatsApp channel
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर