मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Charter Plane Crash : मध्य प्रदेशात चार्टर विमान कोसळलं, एका पायलटचा मुत्यू, दुसऱ्याचा शोध जारी

Charter Plane Crash : मध्य प्रदेशात चार्टर विमान कोसळलं, एका पायलटचा मुत्यू, दुसऱ्याचा शोध जारी

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Mar 18, 2023 06:55 PM IST

Charter Plane Crash : विमानात दोन पायलट होते. त्यापैकी एकाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्या पायलटचा शोध सुरू आहे.

Charter Plane Crash In Madhya Pradesh
Charter Plane Crash In Madhya Pradesh (HT)

Charter Plane Crash In Madhya Pradesh : मध्यप्रदेशच्या बालाघाटमध्ये एक चार्टर विमान कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या विमान अपघातात एका पायलटचा मृत्यू झाला असून दुसरा पायलट बेपत्ता असल्याची माहिती आहे. विमान अपघाताची माहिती मिळताच मध्यप्रदेश पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत मदत व बचावकार्य सुरू केलं आहे. अपघातानंतर चार्टर विमान जळून खाक झाले असून त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांच्या पथकासह स्थानिक नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केल्याची माहिती आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशच्या बालाघाटच्या लांजी-किरणापूर येथील भक्कुटोला टेकडीवर आज दुपारी साडेतीन वाजता चार्टर प्लेन कोसळलं आहे. विमानात दोन पायलट होते, त्यापैकी एका पायलटचा मृतदेह सापडला असून दुसऱ्याचा शोद घेतला जात आहे. अपघातग्रस्त विमानात एक महिला पायलटही होती. एका व्यक्तीचा जळतानाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती स्थानिक पोलीस अधिक्षक समीर सौरभ यांनी दिली आहे. अपघातग्रस्त विमान हे महाराष्ट्रातील गोंदियातल्या बिरसी विमानतळातील प्रशिक्षणार्थी विमान होतं. बिरसी विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर विमान मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात कोसळलं. अपघाताचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर चार्टर विमान आगीत जळून खाक झालं आहे. विमान हवेत असताना तांत्रिक बिघाड झाल्यामुळंच अपघात झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यानंतर आता पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मदत व बचावकार्य जारी आहे. काही दिवसांपूर्वीच मध्यप्रदेशमध्येच एका विमानाला अपघात झाल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता बालाघाटमध्ये चार्जर विमानाला अपघात झाल्याची घटना समोर आल्यामुळं खळबळ उडाली आहे.

IPL_Entry_Point