मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Barabanki Murder Case : पॉर्न व्हिडिओ पाहून महिलांना पकडायचा; पोलिसांकडून सायको तरुणाला बेड्या

Barabanki Murder Case : पॉर्न व्हिडिओ पाहून महिलांना पकडायचा; पोलिसांकडून सायको तरुणाला बेड्या

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 25, 2023 03:54 PM IST

Barabanki Murder Case : पॉर्न व्हिडिओ पाहून महिलांवर अत्याचार करून त्यांची हत्या करणाऱ्या माथेफिरू तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.

Barabanki Murder Case Viral Video
Barabanki Murder Case Viral Video (HT_PRINT)

Barabanki Murder Case Viral Video : अश्लिल व्हिडिओ पाहून महिलांवर अत्याचार करत त्यांची हत्या करणाऱ्या एका तरुणाच्या भयावह कृत्याचा भांडाफोड झाला आहे. महिलांना हेरून त्यांच्यावर अत्याचार करत हत्या करण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातून ही धक्कादायक घटना समोर आली असून यामुळं परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपी तरुण मनोरुग्ण असल्याचं बोललं जात आहे. कारण त्यानं यापूर्वी अनेक महिलांसमोर अश्लिल चाळे करत त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलेलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यूपीतील बाराबंकीतील रामसेन घाट परिसरात शौचासाठी बाहेर पडलेल्या दोन महिलांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली होती. दोन्ही महिलांचे अर्धनग्न अवस्थेतील मृतहेद आढळून आल्यानंतर स्थानिकांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली होती. पोलिसांनी मृत महिलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला होता. बाराबंकीतील आणखी एका परिसरात महिलेवर हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी घटनेचं सीसीटीव्ही फूटेज पोलिसांच्या हाती लागलं. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचं पोस्टर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी लावून माहिती देणाऱ्यास २५ हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं.

त्यानंतर खबऱ्यामार्फत आरोपीची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सडवा गावातून आरोपीला बेड्या ठोकल्या. अनेक महिलांवर अत्याचार करत त्यांची हत्या करणाऱ्या सिरीयल किलरचं नाव अमरेंद्र असं असून तो केवळ १८ वर्षांचा आहे. पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर त्यानं गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिसांनी त्याला गुन्ह्याच्या ठिकाणी नेवून तपास केला आहे. याशिवाय अमरेंद्रच्या हल्ल्यातून वाचलेल्या महिलांनीही त्याला ओळखलं आहे. त्यानंतर आता कोर्टानं आरोपी अमरेंद्रला पोलीस कोठडी सुनावली आहे.

WhatsApp channel