मित्राच्या लग्नात नाचता-नाचता तरुणाला हृदयविकाराचा झटका, जमिनीवर कोसळताच झाला गतप्राण
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  मित्राच्या लग्नात नाचता-नाचता तरुणाला हृदयविकाराचा झटका, जमिनीवर कोसळताच झाला गतप्राण

मित्राच्या लग्नात नाचता-नाचता तरुणाला हृदयविकाराचा झटका, जमिनीवर कोसळताच झाला गतप्राण

Updated Feb 15, 2025 11:07 PM IST

उन्नावमध्ये एका लग्नाच्या आनंदाचे रूपांतर शोकात झाले जेव्हा मित्राच्या लग्नाला आलेल्या अनुज कठेरिया (२४) या तरुणाला डीजेच्या तालावर नाचतानाच हृदयविकाराचा झटका आला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

हार्ट अटॅक
हार्ट अटॅक

यूपीच्या उन्नावमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे लग्नाच्या आनंदाचे रूपांतर क्षणात शोकसागरात झाले. मित्राच्या लग्नाला आलेल्या २४ वर्षीय अनुज कठेरिया या तरुणाला डीजेवर डान्स करताना हृदयविकाराचा झटका आला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदनात हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

हसनगंज कोतवाली परिसरातील दाउदपूर येथील रहिवासी घनश्याम सिंग यांचा मुलगा अंकित याच्या लग्नाची वरात शुक्रवारी नगरपंचायत नियोतानी येथील दयानंद नगर मोहल्ला येथे राहणारे गुरु प्रसाद सिंग यांच्या घरी आली. रात्री उशिरा रिसेप्शनच्या वेळी नवरदेवाचे मित्र डीजेवर नाचत होते. त्यात फर्रुखाबादमधील हरसिंगपूर शाही गावचे रहिवासी अरविंद कुमार कठेरिया यांचा मुलगा अनुज याचाही समावेश होता. डान्स करत असताना अनुज अचानक जमिनीवर कोसळला. यामुळे गोंधळ उडाला. नवरदेवाचे कुटुंबीय त्याला मोहान येथील खासगी रुग्णालयात घेऊन गेले. जिथे डॉक्टरांनी अनुजला मृत घोषित केले.

माहिती मिळताच हसनगंज पोलिसांनी दाउदपूरचे प्रमुख आणि मुलाच्या कुटुंबीयांसमोर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. अनुज दिल्लीत राहून काम करत होता. अंकित दिल्लीत कॅफे चालवतो. त्याचवेळी दोघांची मैत्री झाली होती.

हार्ट अटॅकने मृत्यू झालेल्या महिलेला पाहून घरी आलेल्या व्यक्तीचाही हृदयविकाऱ्याच्या धक्क्याने मृत्यू -

दरम्यान, देवरियात हृदयविकाराच्या झटक्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावलेल्या महिलेला पाहून घरी परतलेल्या एका मध्यमवयीन व्यक्तीचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. १२ तासात गावातील दोघांचा मृत्यू झाल्याची बातमी समजताच दोन्ही कुटुंबावर शोककळा पसरली. गंगाधर बाबा स्थानामागील छोट्या गंडक नदीच्या काठावर दोन्ही मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

लग्नातच नवरदेवाला हार्ट अटॅक -

मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. लग्न समारंभ सुरू असतानाच घोड्यावर स्वार झालेल्या नवरदेवाचा अचानक मृत्यू झाला. यानंतर लग्नात आनंदाने नाचणाऱ्या वऱ्हाडी मंडळींत शोककला पसरली. 

Shrikant Ashok Londhe

TwittereMail

श्रीकांत लोंढे हिंदुस्तान टाइम्स-मराठी मध्ये चीफ कन्टेन्ट प्रोड्यूसर आहे. प्रादेशिक, राष्ट्रीय, राजकीय व गुन्हेविषयक बातम्या कव्हर करतो. प्रिंट आणि डिजिटलमध्ये एकूण १४ वर्षांचा अनुभव. यापूर्वी दैनिक लोकमत, लोकमत समाचार, ईनाडू न्यूज, ईटीव्ही-भारत मध्ये रिपोर्टिग आणि डेस्कवरील कामाचा अनुभव. विशेष स्टोरीज, क्रीडा, राजकारण, मनोरंजन तसेच बिझनेसच्या बातम्याही कव्हर करतात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर