modi putin brics : ‘तुम्हाला कोणत्याही अनुवादकाची गरज नाही', जेव्हा पुतिन यांनी मोदींची केली गंमत; पाहा व्हिडिओ
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  modi putin brics : ‘तुम्हाला कोणत्याही अनुवादकाची गरज नाही', जेव्हा पुतिन यांनी मोदींची केली गंमत; पाहा व्हिडिओ

modi putin brics : ‘तुम्हाला कोणत्याही अनुवादकाची गरज नाही', जेव्हा पुतिन यांनी मोदींची केली गंमत; पाहा व्हिडिओ

Oct 22, 2024 10:04 PM IST

modi putin meet : तीन यांनी भारत आणि रशिया दरम्यान मजबूत सहकार्याचा उल्लेख करताना म्हटले की, त्यांना समजण्यासाठी कोणत्याही अनुवादकाची गरज नाही.

मोदी-पुतीन भेट
मोदी-पुतीन भेट (via REUTERS)

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी ब्रिक्स परिषदेत रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. यामध्ये दोन्ही देशांमध्ये विविध क्षेत्रांमध्ये भागीदारी आणखी मजबूत करण्यावर चर्चा केली गेली. यावेळी  पुतीन यांचा गंमतीशीर स्वभावही पाहायला मिळाला. बैठकीवेळी पुतीन असे काही बोलले की, पीएम मोदीही मोठ मोठ्याने हसू लागले. त्याचे झाले असे की, पुतीन भारत आणि रशियामधील मजबूत नात्याचा उल्लेख करत होते. त्यांनी म्हटले की, दोन्ही देशांमध्ये असे संबंध आहेत, जे समजण्यासाठी कोणत्याही अनुवादकाची गरज नाही.

पुतीन यांनी हलक्या फुलक्या अंदाजात म्हटले की,  "तुम्हाला माझे शब्द समजण्यासाठी ट्रान्सलेटरची गरज नाही. आपल्यामध्ये असे संबंध आहेत की, मला वाटते तुम्हाला कोणत्याही अनुवादकाची (ट्रांसलेटर) गरज नाही. पुतीन यांचे बोलणे एकून पंतप्रधान मोदीही हसू रोखू शकले नाहीत. त्यापूर्वी बैठकीच्या आधी दोन्ही नेत्यांनी एकमेकांचे स्वागत केले. पुतीन यांनी भारत आणि रशिया दरम्यान मजबूत सहकार्याचा उल्लेख करताना म्हटले की, आम्ही भारत-रशिया सहकार्याला खूप महत्व देतो. कारण दोन्ही देश ब्रिक्स चे संस्थापक सदस्य आहेत. आम्ही दोन्ही देशांदरम्यान वाढलेले सहकार्य, परराष्ट्र मंत्र्यांमधील सतत संवाद आणि व्यापारात सकारात्मक वाढ पाहत आहोत.

कजान मध्ये होत असलेल्या  बैठकीत पुतीन यांनी सांगितले की,  ब्रिक्स अंतर्गत देशांमध्ये परस्पर सहकार्य आणखी मजबूत करण्याासाठी काही महत्वपूर्ण निर्णय घेतले जाणार आहेत. त्याचबरोबर बैठकीत रशिया-यूक्रेन युद्धावरही चर्चा झाली. पंतप्रधान मोदींनी भारताची भूमिका स्पष्ट केली. मोदींनी म्हटले की, भारत रशिया आणि यूक्रेन दरम्यान सुरू असलेल्या संघर्षाच्या स्थितीवर नजर ठेऊन आहे. जसे आम्ही आधीही म्हटले होते, ही समस्या शांतिपूर्ण पद्धतीने सोडवली पाहिजे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी संवाद साधला. त्यांनी म्हटले की, रशिया व युक्रेनमध्ये शांततापूर्क वाटाघाटी के्ल्या जाव्यात. यासाठी भारत शक्य ती सर्व मदत करेल. मोदी १६ व्या ब्रिक्स शिखर संमेलनात सहभागी होण्यासाठी रशियातील कजान शहरात पोहोचताच काही तासात पुतीन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी  ब्रिक्सच्या यशस्वी अध्यक्षतेसाठी रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचे अभिनंदन करताना म्हटले की, अनेक देश या समुहात सामील होण्यास इच्छुक आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर