Yogi Adityanath : बटेंगे तो कटेंगे..! तशी चूक करू नका, बांगलादेशमधील अराजकतेवरून योगी आदित्यनाथ यांचा इशारा
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Yogi Adityanath : बटेंगे तो कटेंगे..! तशी चूक करू नका, बांगलादेशमधील अराजकतेवरून योगी आदित्यनाथ यांचा इशारा

Yogi Adityanath : बटेंगे तो कटेंगे..! तशी चूक करू नका, बांगलादेशमधील अराजकतेवरून योगी आदित्यनाथ यांचा इशारा

Updated Aug 26, 2024 04:39 PM IST

Yogi Adityanath on Bangladesh : योगी आदित्यनाथ यांनी बांगलादेशवर टिप्पणी करताना म्हटले की, एकजुटीने राहण्यातच देशाची ताकद आहे. बांगलादेशमधील अराजकतेचे उदारण देताना म्हटले की, आपण जर विभाजित झालो तर कापले जाऊ.

योगी आदित्यनाथ
योगी आदित्यनाथ

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी बांगलादेशचे उदाहरण देताना इशारा दिला की, बटेंगे तो कटेंगे,एकजुटीने राहिलो तरचसुरक्षित राहू. देशाहून महत्वाचे काहीच नाही. राष्ट्र तेव्हाच मजबूत होते जेव्हा आपण सर्व एकजुटीने राहू व प्रामाणिक राहू. तुम्ही बांगलादेशकडे पाहात असाल, तशी चूक येथे होऊ नये. आपल्याला विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी कार्य करायचे आहे.

योगी आदित्यानाथ यांच्या हस्ते आग्रा येथे कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्त दुर्गादास राठोड यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी त्यांनी म्हटले की, आग्र्याच्या कणा-कणात कन्हैयाचा वास आहे. येथे कला, आस्था,समर्पण आणि विश्वास आहे. समाज,जाती,भाषेवरून तोडणाऱ्या शक्तीपासून सावध राहण्याची गरज आहे.

सीएम योगी यांनी राष्ट्रवीर दुर्गादास यांच्या इतिहासासोबतच काकोरी कटातील नायकांच्या के इतिहासावरही प्रकाशझोत टाकला. मुख्यमंत्री योगींनी म्हटले की, काकोरी कटातील नायक पंडित बिस्मिल यांना फाशी दिली जात होती तेव्हा इंग्रजांनी विचारले होते की, तुमची शेवटी इच्छा काय आहे. त्यावर त्यांनी म्हटले होते की, मला धरतीवरच १०० वेळा जन्म मिळावा आणि प्रत्येकवेळी देश व समाजासाठी मृत्यू यावा.

देशाच्या एकात्मतेवर बोलताना योगी म्हणाले की, ऐक्याशिवाय काहीही होऊ शकत नाही;काहीही साध्य होऊ शकत नाही. आपण एकजूट आणि विवेकी राहिलो तरच राष्ट्र मजबूत होईल. आपण फुटलो तर तुटून जाऊ. तुम्ही बघा. बांगलादेशात काय चालले आहे,त्या चुकांची पुनरावृत्ती इथे व्हायला नको.

एकजुटीने राहण्यातच देशाची ताकद आहे. बांगलादेशमधील अराजकतेचे उदारण देताना म्हटले की, आपण जर विभाजित झालो तर कापले जाऊ.

अखिलेश यादव यांची प्रतिक्रिया -

मुख्यमंत्री योगींच्या "बटेंगे तो कटेंगे" या टिप्पणीवरसमाजवादी पक्षाचे प्रमुख आणि लोकसभा खासदार अखिलेश यादव म्हणाले,योगींनी बांगलादेशबाबत केलेले विधान त्यांची पंतप्रधान पदाची आकांक्षा स्पष्ट करते. पंतप्रधान पदांचा आकांक्षा असल्याचे संकेत देण्याची त्यांची ही पहिलीच वेळ नाही. मला विश्वास आहे की. दिल्लीतील अधिकारी स्पष्ट करतील की त्यांनी केंद्रीय प्रकरणांमध्ये ढवळाढवळ करू नये.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर