Yahya Sinwar Hamas New Chief: इराणमध्ये हमासचे माजी प्रमुख इस्माईल हानिये यांची ३१ जुलै रोजी तेहरान येथे हत्या करण्यात आलेली. हानियाच्या हत्येनंतर हमासची धुरा कोंन सांभाळणार या कडे सर्व जगाचे लक्ष होते. हमास संघटनेतील महत्वाचा आणि इस्रायलवर गेल्यावर्षी हल्ला करण्यात प्रमुख भूमिका निभावणारा याह्या सिनवार याला आता हमासचा नवा प्रमुख म्हणून घोषित करण्यात आलं आहे.
पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमासने याह्या सिनवारला आपला नवीन नेता म्हणून निवडले आहे. सिनवार हा गेल्या वर्षी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर झालेल्या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आहे. हमासने मंगळवारी एका निवेदनात म्हटले आहे की त्यांनी सिनवार यांना त्यांच्या राजकीय ब्युरोचे नवीन प्रमुख म्हणून नियुक्त केले आहे. सिनवार आता इस्माईल हनीयेह यांची जागा घेतील.
गेल्या आठवड्यात इराणमध्ये कथित इस्रायली हल्ल्यात हनियाह मारला गेला. गेल्या वर्षी ७ ऑक्टोबर रोजी दक्षिण इस्रायलवर हमासच्या हल्ल्यानंतर सिनवार हा सार्वजनिक ठिकाणी दिसला नाही. तो भूमिगत होता. इस्रायलवर गेल्या वर्षी हमासने केलेल्या हल्ल्यात, अतिरेक्यांनी १२०० इस्रायली नागरिकांना ठार मारले होते. तर सुमारे २५० लोकांना ओलीस ठेवले. या हल्ल्यानंतर इस्रायलने गाझावर मोठी लष्करी कारवाई सुरू केली.
गेल्या महिन्यात ३१ जुलै रोजी इराणच्या राजधानी तेहरान येथे पहाटे झालेल्या हवाई हल्ल्यात हमासचा नेता इस्माईल हनीयेह मारला गेला. इराण आणि दहशतवादी संघटना हमासने बुधवारी ही माहिती दिली. इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिल्यानंतर झालेल्या हनीयेहच्या हत्येसाठी इराण आणि हमासने इस्रायलला जबाबदार धरले आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांनी इस्रायलचा बदला घेण्याची शपथ घेतली होती.
हमासने आपल्या राजकीय ब्युरो चीफ हनियेह यांच्या मृत्यूसाठी इस्रायली हवाई हल्ल्याला जबाबदार धरले. त्याचवेळी, इराणच्या निमलष्करी दल 'रिव्होल्यूशनरी गार्ड'ने सांगितले की ते हनीहच्या हत्येचा तपास सुरू असून या प्रकरणी लवकरच मोठी कारवाई केली जाईल.
याह्या सिनवारन याचा जन्म हा निर्वासितांच्या छावणीत झाला आहे. त्याने त्याचं अर्ध तारुण्य इस्रायली तुरुंगात घालवले आहे. हानियेनंतर याह्या सिनवार हा हमासचा सर्वात शक्तिशाली नेता आहे. याह्या सिनवार ६१ वर्षांचे असून त्यांचा जन्म गाझामधील खान युनिस येथील निर्वासित छावणीत झाला होता. २०१७ मध्ये गाझामध्ये हमासचा नेता म्हणून त्याची निवड झाली होती.