Male Y chromosomes disappearing : विज्ञानाने आपल्याला नेहमीच आश्चर्यचकित केले आहे. रोज नवनवीन शोध लागत असून यातील काही शोध हे मानव जातीसाठी चांगली तर काही धोकादायक ठरत आहेत. मात्र, यावेळी विज्ञानाने एक धक्कादायक रहस्य उघड केले आहे ज्यामुळे जगभरातील पुरुषांची चिंता वाढली आहे. एका नव्या संशोधनानुसार पुरुषांचे Y गुणसूत्र सतत कमी होत असल्याचं उघडं झालं आहे.
पुरुषांमधील वंध्यत्व वाढून पुरुष जात नष्ट होऊ शकते असा दावा या संशोधनात केला आहे. त्यामुळे आतापासूनच पुरुषांनी आपल्या फर्टिलिटीबाबत जागरूक राहणे गरजेचे आहे. पुरुष वंध्यत्वामध्ये शुक्राणूंची कमी संख्या, शुक्राणूंची खराब अवस्था, हार्मोनल असंतुलन, अनुवांशिक समस्या आदींचा समावेश होतो.
या अभ्यासामुळे मानवाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. या अभ्यासात दावा करण्यात आला आहे की Y गुणसूत्र (यामुळे पुरुषांची लैंगिक ओळख केली जाते) हळूहळू संकुचित पावत आहेत. हे गुणसुत्र पूर्णपणे नष्ट होण्याची शक्यता आहे. Y क्रोमोसोम म्हणजे काय आणि ते का कमी होत आहे ते सविस्तरपणे जाणून घेऊयात.
Y गुणसूत्र हे पुरुषांमध्ये आढळणारे लैंगिक गुणसूत्र आहे. दाढी, स्नायूंची वाढ आणि पुरुष जननेंद्रियांच्या विकासासारख्या पुरुष वैशिष्ट्यांसाठी हा घटक जबाबदार असतो. महिलांमध्ये XX गुणसूत्र असतात, तर पुरुषांमध्ये XY गुणसूत्र असतात. Y गुणसूत्राचा हा 'Y' पुरुषांना स्त्रियांपेक्षा वेगळा बनवतो. जेव्हा स्त्रीच्या गर्भाशयात X आणि Y हे गुणसूत्र येतात तेव्हा मुलगा जन्माला येतो. आणि जेव्हा गर्भात XX गुणसुत्रे एकत्र येतात तेव्हा मुलीचा जन्म होतो. मात्र आता Y गुणसुत्र नष्ट होत चालल्याच संशोधनात सांगितलं आहे. यामुळे पुरुष प्रजाती आणि कालांतराने पर्यायाने मानवजात नष्ट होणार असल्याचं म्हटलं जातं.
नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की Y गुणसूत्र पुरुषांमध्ये कमी होत आहे. Y क्रोमोसोझोमचे आकुंचन लाखो वर्षांपासून सुरू असल्याचं शास्त्रज्ञांचं मत आहे. याचे कारण असे की Y गुणसूत्र इतर गुणसूत्रांपेक्षा अधिक वेगाने उत्परिवर्तन करत असतात. याव्यतिरिक्त, Y क्रोमोसोममध्ये इतर गुणसूत्रांपेक्षा कमी जीन्स असतात, ज्यामुळे ते आकुंचन पावण्याची शक्यता ही सर्वाधिक असते.
Y क्रोमोसोम आकुंचन पावत असल्याच्या बातमीने पुरुषांच्या अस्तित्व धोक्यात आहे का? हा प्रश्न निर्माण झाला आहे. जर Y गुणसूत्र नाहीसे झाले तर पुरुष देखील नष्ट होतील का? Y क्रोमोसोम पूर्णपणे नष्ट होण्याची शक्यता असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. तथापि, ही प्रक्रिया पुढील लाखो वर्षांमध्ये होईल. Y गुणसूत्र नाहीसे झाल्यास मानवी प्रजातीचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते. याचा पुरुषांच्या लैंगिक जीवनावर व प्रजनन क्षमतेवर देखील दूरगामी परिणाम होऊ शकतो.
शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की जर Y गुणसूत्र नाहीसे झाले तर मानवी प्रजातींमध्ये नवीन लिंग निर्धारण प्रणाली विकसित होऊ शकते. तथापि, ही प्रक्रिया खूप गुंतागुंतीची असेल आणि या साठी लाखो वर्षे लागू शकतात.
प्रोफेसर ग्रेव्स यांचं म्हणणं आहे की, या अभ्यासात अशी माहिती मिळाली आहे की, मानवामध्ये सेक्स डिटरमिनिंग जीन विकसित झाला आहे. हे इतकं सहज सोप्पं नाही. पुढे त्यांनी म्हटलं की, तसेच या नव्या सेक्स डिटरमिनिंग जीन विकसित होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. संशोधकांनी वर्तवलेल्या भीतीनुसार, Y गुणसुत्र लोप पावत चालल्यामुळे पुरुष प्रजात नामशेष होईल. यामुळे जगात फक्त महिला राहतील. पण महिला राहिल्यावर फक्त XX गुणसुत्रे असतील. Y गुणसुत्रांची कमतरता भासली तर XY यांचा मिलाप न झाल्यामुळे पर्यायाने मानव जातच नष्ट होईल.