मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Xiaomi Fan Festival 2024: स्मार्टफोन, स्मार्ट टीव्हीपासून एआयओटी डिव्हाइसपर्यंत आकर्षक सूट

Xiaomi Fan Festival 2024: स्मार्टफोन, स्मार्ट टीव्हीपासून एआयओटी डिव्हाइसपर्यंत आकर्षक सूट

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Apr 06, 2024 10:50 PM IST

Xiaomi Fan Festival 2024 India: शाओमी फॅन फेस्टिव्हल २०२४ ला भारतात सुरुवात झाली असून जागतिक ब्रँडच्या १४व्या वर्धापन दिनानिमित्त स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट मिळत आहे.

शाओमीच्या अनेक वस्तूंच्या खरेदीवर ग्राहकांना आकर्षक सूट मिळत आहेत.
शाओमीच्या अनेक वस्तूंच्या खरेदीवर ग्राहकांना आकर्षक सूट मिळत आहेत. (REUTERS)

Xiaomi India Fan Festival: शाओमी फॅन फेस्टिव्हल २०२४ ला भारतात सुरुवात झाली असून जागतिक ब्रँडच्या प्रवासाला १४ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने शाओमी आणि रेडमी कंपनीचे स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही आणि एआयओटी उत्पादनांवर आकर्षक सूट मिळत आहे. शनिवारपासून सुरू झालेल्या या फेस्टिव्हलमध्ये आठवडाभर आकर्षक डील्सचा मेजवानी पाहायला मिळणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

ग्राहक मूळ किंमतीपेक्षा कमी किंमतीत अनेक वस्तू खरेदी करू शकतात. शाओमी फेस्टीव्हलमध्ये ग्राहकांना अनेक खरेदीवर अधिक बचत करता येणार आहे. शाओमी कंपनीचे शौकिन या ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात. 

Vivo V30 Lite: अवघ्या अर्ध्या तासात ८० टक्के चार्ज होणार; विवो व्ही ३० लाइट बाजारात लॉन्च, जाणून घ्या किंमत

शाओमी कंपनीचा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी भन्नाट ऑफर आहे. शाओमी १४ स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना १० हजारांची बचत करता येणार आहे. शाओमी १४ स्मार्टफोनची मूळ किंमत ६९ हजार ९९९ रुपये आहे. परंतु, शाओमी फॅन फेस्टीव्हलमध्ये ग्राहकांना हा स्मार्टफोन अवघ्या ५९ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येणार आहे. त्याचप्रमाणे रेडमी नोट १३ प्रो 5G च्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली.  हा स्मार्टफोन ३१ हजार ९९९ रुपयांत लॉन्च करण्यात आला होता. मात्र, हा स्मार्टफोन २८ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येऊ शकतो.  रेडमी पॅड ६ आणि रेडमी स्मार्ट फायर टीव्ही 4K ४३ वर ही लक्षणीय सूट देण्यात आली आहे.

Amazon Sale: कपड्यांपासून दागिन्यांपर्यंत, काहीही खरेदी करा अवघ्या ६०० रुपयांत; ॲमेझॉनचा भन्नाट सेल

कॉम्बो ऑफर्समुळे ग्राहकांना आणखी फायदा मिळू शकतो. एकसोबत अनेक वस्तूंची खेरदी केल्यास ग्राहकांना आणखी पैशांची बचत करता येणार आहे. दोन रेडमी वॉच ३ अ‍ॅक्टिव्ह युनिट्स ४ हजार ९९९ रुपयांच्या कमी किंमतीत उपलब्ध आहेत, तर रेडमी नोट १३5G (१२जीबी + २५६ जीबी) आणि रेडमी बड्स ५ बंडल ऑफर २३ हजार ७९८ रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

Samsung M Series : कुठेही आणि कसाही काढा फोटो! सॅमसंगच्या 'या' फोनमध्ये मिळणार 'नो शेक कॅमेरा' फीचर!

या एक्सक्लुझिव्ह ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरील शाओमी फॅन फेस्टिव्हल २०२४ च्या लँडिंग पेजला भेट देऊ शकतात किंवा फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनसारख्या लोकप्रिय ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर डील्स एक्सप्लोर करू शकतात. याव्यतिरिक्त, शाओमी होम आणि शाओमी रिटेल स्टोअर्सवर देखील या ऑफर्सचा लाभ घेता येऊ शकतो. ही ऑफर फक्त १२ एप्रिलपर्यंत मर्यादित आहे.

IPL_Entry_Point

विभाग