Thinnest Building In World: प्रत्येकाचे अलिशान घरात राहण्याचे स्वप्न असते. आजपर्यंत तुम्ही अनेक आलिशान घरे पाहिली असतील. प्रत्येकजण आपापल्या क्षमतेनुसार घर बांधतो. पण, तुम्ही जगातील सर्वात पातळ घर कधी पाहिले आहे का? १९५४ मध्ये एक घर बांधले गेलेल्या घराची जगभरात चर्चा झाली. काही लोक याला 'जगातील सर्वात चिंचोळे' इमारत असेही म्हणतात. या घराच्या बांधकामामागे एक रंजक कथा आहे. दोन भावांच्या भांडणानंतर या घराचा पाया रचला गेला आणि आज ते ऐतिहासिक बनले आहे.
तुम्हाला जगातील सर्वात पातळ घर पाहण्यासाठी तुम्हाला मध्य पूर्वेतील लेबनॉन देशात जावे लागेल. हे घर ज्या भागात आहे तो भाग 'अल-बासा' म्हणून ओळखला जातो. ही इमारत पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या इमारतीच्या एका बाजूची जाडी केवळ २ फूट आहे. हे घर पाहण्यासाठी जगाच्या विविध भागातून लोक लेबनॉनमध्ये येतात. या घराच्या उभारणीमागे आडमुठेपणा आणि द्वेषपूर्ण हेतू होता, असेही सांगितले जाते.
दोन भावांच्या भांडणातून हे घर बांधले गेल्याचे बोलले जाते. दोन्ही भावांना वडिलांच्या मालमत्तेतून जमीन मिळाली होती. दोघांनी जमीनीची वाटणी केली. अनेक वर्षांनंतर त्या ठिकाणी सरकारी प्रकल्पांतर्गत रस्ता तयार होणार होता. एका भावाने या योजनेसाठी जमीन सरकारला देण्याचे मान्य केले. परंतु, दुसऱ्या भावाने कोणत्याही किंमतीला जमीन देण्यास नकार दिला. आपल्या भावाने ही जमीन सरकारला देण्याऐवजी स्वतःकडेच ठेवावी, अशी त्याची इच्छा होती. परंतु, मात्र तरीही त्याच्या भावाने आपली जमीन सरकारला दिली. यामुळे एक भाऊ संतापला. त्याने रागाच्या भरात अरुंद जागेत घर बांधले, जेणेकरुन दुसऱ्या भावाला समुद्राचे दृश्य पाहता येणार नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या या घरात कोणीही राहत नाही. ही इमारत आजही उभी असून जगभर प्रसिद्ध आहे. सरकारने ही जागा हेरिटेज म्हणून घोषित केलेली नाही. तेथील कायद्यानुसार, ही जागा डेव्हलपर्सला विकता येत नसल्याचे सांगण्यात येत आहे. आता या ठिकाणी बांधकाम परवानगी दिली जाणार नाही.
संबंधित बातम्या