Worlds Smallest Fish: जगातील सर्वात लहान मासा पाहिलात का? जाणून घ्या त्याचे नाव आणि आकार!-worlds smallest fish know about danionella cerebrum ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Worlds Smallest Fish: जगातील सर्वात लहान मासा पाहिलात का? जाणून घ्या त्याचे नाव आणि आकार!

Worlds Smallest Fish: जगातील सर्वात लहान मासा पाहिलात का? जाणून घ्या त्याचे नाव आणि आकार!

Mar 28, 2024 01:51 PM IST

Danionella Cerebrum: शास्त्रज्ञांनी डॅनिओनेला सेरेब्रम शोधून काढलेल्या जगातील सर्वात लहान माशाबाबत जाणून घ्या.

जगातील सर्वात लहान माशाबाबत जाणून घ्या.
जगातील सर्वात लहान माशाबाबत जाणून घ्या.

Worlds Smallest Fish: समुद्रात राहणाऱ्या माशांच्या लाखो प्रजाती आहेत. यातील बहुतेक माशांबद्दल आपण पुस्तकात किंवा डिस्कव्हरी चॅनेलवर पाहिले आहे. पंरतु, तुम्हाला जगातील सर्वात लहान मासा कोणता आहे, याबाबत माहिती आहे का? जो मासा माणसाच्या नखाएवढा आहे. शास्त्रज्ञांनी शोधून काढलेल्या माशाचे नाव आणि आकार जाणून घेऊयात.

मिळालेल्या माहितीनुसार, बर्लिनमधील शास्त्रज्ञांना म्यानमारच्या नद्यांमध्ये एक अनोखा मासा आढळला. डॅनिओनेला सेरेब्रम, असे या माशाला नाव देण्यात आले आहे. या माशाचा आकार फक्त १२ मिलिमीटर असून तो पूर्णपणे पारदर्शक आहे.परंतु, हा मासा १४० डेसिबलपेक्षा मोठा आवाज काढू शकतो. बंदुकीची गोळी, ॲम्ब्युलन्स सायरनपेक्षा या माशाचा आवाज जास्त आहे. जलचरांमध्ये सर्वात मोठा आवाज कोळंबीचा मानला जातो, जो सुमारे २०० डेसिबलपर्यंत आवाज करू शकतो. मोठ्या माशाला घाबरवण्यासाठी हे मासे मोठा आवाज काढतात.

शास्त्रज्ञांनी डॅनिओनेला सेरेब्रम माशाला बर्लिनला नेऊन संशोधन केले. पीएनएएस जर्नलमध्ये प्रकाशित संशोधनाचे प्रमुख लेखक व्हेरिटी कुक यांनी सांगितले की, डॅनिओनेला सेरेब्रमचा आवाज इतका मोठा आहे की, व्यक्ती फिश टँकजवळ गेल्यास माशा गेल्यास त्याला आवाज ऐकून भिती वाटू शकते. हा मासे खूप लहान आहेत, पण त्यांचा आवाज खूप मोठा आहे.

कुकच्या मते, सर्व हाडांच्या माशांना स्विम ब्लॅडर असते. एक वायूने ​​भरलेला अवयव जो त्यांना पाण्याखाली राहण्यास मदत करतो. अनेक मासे त्यांच्या स्नायूंचा वापर या मूत्राशयावर आवाज काढण्यासाठी करतात.पण डॅनिओने सेरेब्रम मासा इतरांपेत्रा वेगळा आहे. आवाज काढताना त्याचे स्नायू हाडावर आदळतात आणि मोठा आवाज होतो. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रजातीचे नर आणि मादी दोघेही आवाज काढतात. साधारणपणे इतर मादी मासे आवाज काढत नाहीत.

Whats_app_banner
विभाग