World Richest Shoes: जगभरात अनेक महागडे बूट आहेत. पंरतु, एखाद्या बूटची किंमत शंभर कोटींपेक्षा जास्त असू शकते, याची कोणीच कल्पना केली नसेल. तर, मग जगातील सर्वात महागड्या बूटबद्दल जाणून घेऊयात. जगातील सर्वात महागड्या बुटाचे नाव 'मून स्टार शूज' आहे. इटालियन शूज डिझायनर अँटोनियो व्हिएत्री यांनी हे बूट डिझाइन केले. दरम्यान, २०१९ मध्ये दुबई येथे आयोजित एनआयडीई फॅशन वीक दरम्यान हे आश्चर्यकारक शूचे प्रदर्शन करण्यात आले. या बुटाची किंमत १९.९ मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे १६४ कोटी रुपये आहे. हे ऐकून अनेकांना विश्वास बसणार नाही. अनेक करोडपतींची संपत्तीही या बुटाच्या किमती इतकी नाही.
मून स्टार शूजची टाच सोन्याने बनलेल्या आहेत. तसेच हे शूट ३० कॅरेट सोन्याने सजवण्यात आले आहे. यासोबतच या बुटात एक विलक्षण आणि दुर्मिळ वस्तू देखील समाविष्ट करण्यात आली आहे. या बुटावर सोने, हिरे इत्यादी जडवलेले आहेत. पण अर्जेंटिनाच्या उल्केचा तुकडाही त्यात जडलेला आहे. ही उल्का १५७६ सालची आहे. यामुळेच हे बूट मौल्यवान असून ऐतिहासिकही आहे. 'मून स्टार शूज' डिझाइन करणारे अँटोनियो व्हिएत्री यांनी यापूर्वीही असे शूज बनवले आहेत. अँटोनियो व्हिएत्रीने २०१७ मध्ये जगातील पहिला २४ कॅरेट सोन्याचा शूज डिझाइन केला. त्यानंतर जगभरात त्याची चर्चा झाली. अँटोनियो व्हिएत्री लक्झरी आणि महागड्या फॅन्सी वस्तू बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे.
बेंगळुरूमधील एका सॉफ्टवेअर इंजिनीअरने सोशल मीडियावर त्याच्या फ्लॅटमधील पाणी गळतीचे फोटो शेअर केले. फोटो शेअर करताना अभियंत्याने सांगितले की, त्याच्या फ्लॅटची किंमत १.५ कोटी रुपये आहे आणि ती आधीच या स्थितीत आहे. फ्लॅटचे फोटो शेअर करताना अभियंत्याने वाढत्या महागाईच्या काळात रिअल इस्टेटच्या काळ्या कारनाम्यावर टीका केली. अभियंत्याने सोशल साइट एक्सवर आपल्या हँडलने ही पोस्ट शेअर केली.
रिपुदमन नावाच्या युजरने सांगितले की, दीड कोटी रुपयांच्या अपार्टमेंटमध्ये त्याच्या खोलीच्या छतातून पाणी गळू लागले. त्यांचा फ्लॅट १६ मजली इमारतीच्या पाचव्या मजल्यावर आहे. व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये त्याच्या खोलीच्या छतावर पाण्याच्या थेंबामुळे होणारा ओलावा दिसत आहे. फोटो पोस्ट करत रिपुदमनने लिहिले की,'माझ्या १.५ कोटी रुपयांच्या फ्लॅटच्या खोलीतून पाणी गळत आहे. या महागड्या इमारतीमध्ये घोटाळा झाला.'
रिपुदमन यांची ही पोस्ट सातत्याने व्हायरल होत आहे. त्यांच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत बिल्डरांनी केलेल्या निकृष्ट बांधकामावर टीका केली. एका युजरने कमेंटमध्ये म्हटले आहे की, खरे तर संपूर्ण अपार्टमेंट ५० लाख रुपये किंवा त्याहूनही कमी खर्चात बांधले गेले असावे. दुसऱ्याने लिहिले आहे की, तुमच्या वरच्या मजल्यावर लीकेज असू शकते. हे आमच्या बाबतीतही घडले आहे. वरच्या मजल्यावरील पाईपमध्ये गळती होती.